Loading ...
/* Dont copy */

मला वारीला जायचंय - स्फुटलेखन (तेजश्री कांबळे-शिंदे)

मला वारीला जायचंय (स्फुटलेखन) - मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद लेखिका तेजश्री कांबळे-शिंदे यांचे मला वारीला जायचंय हे स्फुटलेखन.

मला वारीला जायचंय - स्फुटलेखन (तेजश्री कांबळे-शिंदे)

वारी म्हंटलं कि टाळ, मृदूंग, विणा अशी वाद्ये आठवतात...


मला वारीला जायचंय

मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद लेखिकातेजश्री कांबळे-शिंदे’ यांचे ‘मला वारीला जायचंय’ हे स्फुटलेखन.



पांडुरंग हरी विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽऽ हा नाद कानी पडताच लाडक्या पांडुरंगाची आठवण होते!

वारी म्हंटलं कि टाळ, मृदूंग, विणा अशी वाद्ये आठवतात व त्यातील मधुर आवाज कानी पडतो अन्‌ मन शांत होते. पायी तासन तास चालणाऱ्या वारकरी भक्त ज्यांना आषाढी एकादशीची ओढ लागते त्यांचे आपोआप पाय पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतात, पांडुरंगाला भेटण्याची ओढ मनात निर्माण होते. पांडुरंगाला पाहताच क्षणी डोळ्याला पाझर फुटते, अश्रू वाहू लागतात.

पांडुरंगामध्ये एक अशी अद्‌भुत शक्ती आहे जी आपल्याला त्याची ओढ लावते; त्याचं भावनेने ‘आषाढी एकादशी’ उत्सव साजरा करावा, भक्ती भावाने पांडुरंगाचे नाम घ्यावे.

वारकरी भक्त पहिल्या सारखा राहिलाच कुठे हो? आताची मुले वारकरी संप्रदायात जाण्यास नकार घंटा वाजवतात. आताच्या तरुणपिढीने वारकरी हा शब्द देखील उच्चारण कठीण झालंय. आपल्या थोरल्या जुन्या वारकरी भक्तांनी पायी वारी जाण्याची परंपरा अजून चालू ठेवली आहे,पण तीच परंपरा आपल्या नव्या पिढीने पुढे चालू ठेवली पाहिजे. पांडुरंगाची ओढ ज्याला कळली तोच पांडुरंग पाहू शकला. जिथे तो विटेवर उभा आहे तिथं अक्ख जग उभं आहे. त्याच जगात वारकरी आहेत. वारकरी होणं सोपं नाही त्यासाठी मुखी पांडुरंग नाम हवं.

तरुणपिढी ह्यात रुजावी अन्‌ पुढे पुढे वारीची परंपरा चालतं न्यावी, जे आपल्या माय बापाने शिकवले वारी करा आणि करत राहा आपली परंपरा तोडू नका...जिथं विठू माउली तिथं त्याची सावली.

प्रत्येक तरुण पिढीने अभिमानाने पुढाकार घेऊन आपल्याला विठ्ठलाला हाक मारण्यासाठी वर्षातून एकदा नक्कीच वारी करावी. प्रत्येक तरुणपिढीच्या दरवर्षी मुखात एकच शब्ध यावं ‘मला वारीला जायचंय...’


मला वारीला जायचंय - स्फुटलेखन (तेजश्री कांबळे-शिंदे) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- तेजश्री कांबळे-शिंदे

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची