Loading ...
/* Dont copy */

पंढरपूर वारी - एक अविस्मरणीय अनुभव - अनुभव कथन (जाई नाईक)

पंढरपूर वारी - एक अविस्मरणीय अनुभव - अनुभव कथन (जाई नाईक) - ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता सतत २१ दिवसांच्या पंढरपूरच्या पायी वारीचा मी घेतलेला अनुभव.

पंढरपूर वारी - एक अविस्मरणीय अनुभव - अनुभव कथन (जाई नाईक)

सतत २१ दिवस पंढरपूरची वारी पायी करणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता


पंढरपूर वारी - एक अविस्मरणीय अनुभव - अनुभव कथन (जाई नाईक)

बरेचदा मनात असलेली तीव्र इच्छा पूर्ण होण्याचे भाग्य सगळ्यांना लाभते का? अजिबात नाही; काही थोडेच असे भाग्यवान असतात. पण मला सांगायला आनंद होतो, की अशा थोड्याच भाग्यवानांपैकी मी एक आहे. पंढरपूरची वारी, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या, वारक-यांच्या दिंड्या, त्यांचे अनुक्रमे आळंदी आणि देहू या गावांमधून निघून ऊन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता सतत २१ दिवस पंढरपूरला पायी जाणे हे शब्द कानावर पडत होते. असे वाटायचे या वारीत सामील होऊन हा अद्वितीय अनुभव कधी तरी घेऊ शकू का? माझे आवडते समाजकार्य चालूच होते.

पण दरवर्षी जुलै महिना उजाडला की पंढरपूरच्या वारीचा विचार मनात यायचा आणि तो तसाच जायचाही! म्हणता म्हणता २०२२ साल उजाडले आणि का कोणास ठाऊक पण या वर्षी काय वाटेल ते झाले तरी ‘वारी’ करायचीच असा मी मनाशी पक्का निग्रह केला! बहुतेक विठ्ठल-रुक्माई यांनाही त्यांच्या या वेड्या भक्ताने पंढरपूरला यावे असे वाटले असणार म्हणून माऊलीने तो योग जुळवून आणला.



पंढरपूर वारी - १८ जून २०२२


१८ जुनला माझे सहकारी नायकलभाऊंना मी म्हटले, की यंदा मला वारीला यायचे आहे. योगायोग असा, की मी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते नावनोंदणीसाठीच निघत होते. त्यांना माझा निरोप वेळेवर गेला आणि लगेचच नावनोंदणी झाली. रजिस्टर्ड दिंडी म्हणजे ७, ८ वर्ष सतत वारी करत असताना त्यांची पाहणी काही साध्या वेशात संस्थेचे लोक करतात. त्या वारीत वारीचे मुख्य चालक मालक कश्या पद्धतीने वारी हाताळत, वारी मध्ये भांडण होते का, वारकऱ्यांची सोय कशी केली जाते वगैरे ची नोंद होते आणि मगच योग्य असलेल्या दिंडीला रजिस्टर नंबर दिला जातो. वारीतील प्रत्येक दिंडी स्वत:चे सर्व साहित्य स्वत: आणते. सर्व साहित्य नेण्यासाठी साठी व वारकऱ्यांचे सामान ठेवण्यासाठी २, ३ ट्रक व १ पाण्याचा टँकर असतो. माझ्या दिंडीचा नंबर १३४ होता.

नाव नोंदणी तर झाली आता प्रश्न होता तो घरच्यांची ह्यावर काय प्रतिक्रिया असेल? घरातील मंडळी मला जाऊ देण्यास काळजीपोटी संमती देणार नाहीत, असे मला मनोमन वाटत होते. म्हणून मी निघण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे २० जुनला सगळ्यांना सांगितले, की मी उद्या वारीसाठी बाहेर पडत आहे. ती पूर्ण करून बावीस दिवसांनी घरी परतेन. पण लगेच घरच्यांनी वारीचे तपशील समजून प्रवासाची तयारी करून दिली. वारकरी सोबत काय साहित्य घेतात हे नायकलभाऊंशी बोलून समजून घेतले. वारीतील लोक पावसासाठी प्लास्टिकचा कागद वापरतात म्हणून मीही तसा घेत होते, त्यासाठी मात्र मुलांनी विरोध केला आणि त्वरित त्याने प्रवासासाठी सुकर व वजनाला हलका असा रेनकोट आणून दिला.

[next]

पंढरपूर वारी - २० जून २०२२


नायकलभाऊ (खेडहून, तालुका चिपळूण) व मी (बोईसर) हुन हे पुण्याला भेटून आळंदीला सोबत जाणार होतो. त्यासाठी मी बोइसरहून दोन बसगाड्या बदलून पुण्याला जाणार होते. एकटीच बॅगा घेऊन दोन गाड्या बदलून जाण्याऐवजी मुलीने दिनांक २०.०६.२०२२ ला सकाळी सहा वाजता मला ‘बोइसर-कोल्हापूर’ बसमधे बसवून दिले. मला बसावयास चांगली जागा मिळाली. दरम्यान नायकलभाऊंची पुणे बस चुकली होती; पण त्यांनी आमचे वाकडचे दुसरे सहकारी भोसले भाऊ यांना फोन करून सांगितले, की माझी बस चुकली आहे. नाईक मॅडमना तुम्ही घेऊन आळंदी ला पोचा.

त्याप्रमाणे भोसले यांनी मला वाकड ला उतरण्यास सांगितले व मला नेण्यासाठी मुलाला पाठवले. भोसलेंच्या घरचा पाहुणचार घेऊन थोडा आराम करून त्यांच्या मुलाने आम्हा दोघांना पुणे महामार्गावर सोडले. तेथे लगेच आम्हाला थेट आळंदीला जाणारी बस मिळाली. आळंदीचीच बस असल्याने बस पूर्ण भरली होती. आम्ही कसेबसे चढलो पण थोड्याच वेळानी आम्हाला बसायला जागा मिळाली. इथूनच माझ्या वारीच्या प्रवासाची सुरुवात चांगली झाली असे म्हणण्यास हरकत नाही. माऊली सोबत आहे याची प्रचेती ची सुरुवात झाली होती.

संध्याकाळी साडेपाच वाजता वडमुखवाडीला आलो. वारकरी संप्रदाय कसा असतो हे इथे पोहचल्यावर दिसले. आमच्या दिंडीतले सर्व वारकरी (१५० वारकरी) नेहमी वारी करणारे होते आणि त्यांच्या मध्ये मी पहिल्यांदाच वारी ला जाणारी होते. सर्व वारकऱ्यांची ओळख करून घेतली. हे सगळे माझ्या साठी खूप वेगळेच होते. त्या दिवसाची सोय एका सोसायटीच्या गाडी पार्किंग मध्ये होती. सगळ्या सारखे मीही बरोबर घेतलेला प्लास्टिकचा पेपर अंथरून त्यावर पातळ चादर घालून झोपले. दिनांक २१.०६.२०२२, पहाटे तीन वाजताच उठलो. अंघोळी साठी महिला व पुरुष यांची काही वेगळी सोय नव्हती. सर्व वारकरी उघड्यावर पाण्याच्या टँकर खाली अंघोळी करतात.

समोरचे ते दृश्य पाहून मी विचारात पडले. अशी उघड्यावर आजूबाजूला पुरुष असताना आपण अंघोळ कशी करणार? माझी विवंचना इथल्या एका महिला वारकरीच्या लक्षात आली व तिने मला लहान मुलांसारखी स्वतः टँकर खाली नेऊन अंघोळ घातली आणि त्या दिवसापासून माझी मनाची तयारी झाली. त्या दिवशी तिथे मुक्कामी होतो. अशी प्रथा आहे की त्यादिवशी माऊलीची पालखी आळंदी जवळच असलेल्या मामाच्या गावाला वस्ती राहायला जाते. आळंदी म्हणजे आत्मानंद. लाखोंचा जनसमुदाय एकत्रित श्रींचा होणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम’ हा गजर केवळ एक सांप्रदायिक नामजप नसून त्यास सोऽहं साधनेचे अधिष्ठान आहे. एक श्वास तर दुसरा उच्छ्श्वास आहे, आणि एक उच्छ्श्वास आहे तर दुसरा श्वास आहे. त्या वेळी मी पाहत असलेली आळंदी म्हणजे, आकाशात जसे शुभ्र चांदणे असते तसे त्या संपूर्ण परिसरात पांढरा झब्बे पायजमा, डोक्यावर टोपी, हातात झेंडे नी व्यापलेला असतो.  पालखीचा प्रारंभ आत्मनंदातून होतो. इथे लहान असो कि मोठे, सगळ्यांना ‘माउली’ नावाने हाक मारतात.

[next]

पंढरपूर वारी - २२ जून २०२२


दुसरे दिवशी २२.०६.२०२२, पुरुष मंडळी उठायच्या आधी उठून आंघोळ करुन तयार झाले. गरम गरम बिन दुधाचा (काळा) चहा, नाष्टा घेऊन आळंदीहुन पायी भोसरीफाटा येथे माऊलीची पालखी येण्याची वाट बघत होतो.

आदल्या दिवशी मामाच्या घरी वस्ती असलेली पालखी मंदिरात येते. प्रथेनुसार पालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारे श्री माऊलींचे अश्व हे ‘श्री श्रीमंत शितोळे सरकार‘ यांचे अंकली - बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणले जातात. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हे अश्व ज्येष्ठ शु॥११ ला अंकलीवरून प्रस्थान करतात आणि जेष्ठ वद्य ७ ला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतात. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते.

त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात. अश्वाला आळंदीसं पायी आणण्याच्यामागे केवळ परंपराच नाही तर एक श्रद्धाही जोडलेली आहे हा अश्व अंकली (बेळगाव) वरून आळंदी येताना ज्या ज्या गावी जातो तेथील जनसमुदाय त्याचे दर्शन घेतात; कारण त्याला केलेला नमस्कार श्री माऊलीच्याकडे आणि त्यांच्या करवी श्री पंढरीच्या विठुरायाकडे पोहोचतो अशी दृढ श्रद्धा असते. हेच मानाचे अश्व मंदिरात असलेल्या माऊलीच्या पालखीस प्रदक्षिणा घालून नमस्कार करतात. अशी ख्याती आहे की मंदिराचा कळस हलाल की पालखी निघायचा संकेत मिळाला आणि पालखी आळंदीहुन निघते.

 

पालखी च्या पुढे  मानाच्या बैलगाडीत मनाचा नगारा, नंतर हातात पताका घेतलेला घोडेस्वार, त्यानंतर माऊलीचा सुटा घोडा, नंतर हातात क्रमांकाची पाटी घेतलेला वारकरी, त्यानंतर पाच वारकरी हातात पताका घेऊन असतात आणि एका वारकऱ्याकडे क्रमांकाची पाटी असते. त्यांच्यामागे टाळ व ढोल वाजविणारे वारकरी असतात.  त्यांच्यामागे एक महिला डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन तर दुसरी डोक्यावर तुळस घेऊन आणि एक वीणाधारी असे तिघे एका रांगेत असतात. पालखीच्या पुढे फक्त २५ दिंड्या असतात आणि पालखी मागे बाकी सर्व हजारानी दिंड्या. या वर्षी सुमारे २५०० दिंड्या होत्या. पालखी ज्या गावावरून पंढरपूरला जाते त्या गावांची नावे सुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आहेत. मी पुढे त्या त्या गावांचे अर्थाचा उल्लेख केला आहे.

दोन तासांनी भोसरीफाटा येथे पालखी आली व १३४ दिंडी नंबर आल्यावर आम्ही त्यात सहभागी झालो. संगमवाडी, पुणे येथे जेवण व विसावा घेतला. पुणे म्हणजे “पालखीबरोबर निघालो की जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन पुण्य प्राप्त होते". (भवानी पेठ, बुरडाच्या पुलाकडील पालखी विठोबा मंदिर, पुणे या ठिकाणी पालखीचा दोन दिवस मुक्काम असतो) रात्री गणेश मार्केट, येथे पोहचलो. इथे एका सोसायटीच्या गाडी पार्किंग मध्ये आमची जेवणाची व झोपायची सोय केली होती. जेवणाच्या आधी वारकऱ्यांनी हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग म्हंटले व सोसायटीतले राहिवासी ही उत्साहाने सहभागी झाले.

[next]

पंढरपूर वारी - २३ जून २०२२


दिनांक २३.०६.२०२२, ठरवल्या प्रमाणे पहाटे उठून आवरले. जवळच गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले व बाजूच्या दुसऱ्या सोसायटी तर्फे चहा, नाष्टा झाला. अचानक माझी दाढ खूप दुखू लागली. योगायोगाने त्याच सोसायटी मध्ये दातांचे डॉक्टर होते. त्यांना दाखवले, त्यांच्या सल्याप्रमाणे दाढ काढावी लागणार होती. पण मनात भीती होती की आत्ता तर वारीची सुरुवात झाली आहे अजून मला इतका प्रवास करायचा आहे दाढ काढिली आणि पुढे रस्त्यात काही त्रास झाला तर? पण माऊलीचे नाव घेतले व दाढ काढली. वारकरी म्हणून डॉक्टरांनी एक रुपया ही घेतला नाही. त्या गणेश मार्केट परिसरात, वारकर्‍यांना केस, दाढी करायचे पैसे घेत नाहीत. अनेक दुकानदार वारकऱ्यांची अशी मनोभावे सेवा करतात. त्या दिवशी आमच्या मुक्काम इथेच होता.

[next]

पंढरपूर वारी - २४ जून २०२२


दिनांक २४.०७.२०२२, पहाटे उठून आवरून पुढच्या प्रवासा साठी सज्ज झाले. पहाटे उठून आवरण्यामागचे कारण म्हणजे आपले धुतलेले कपडे, अंथरूण पांघरूण व इतर सामान आपल्या दिंडी सोबत असेलेल्या ट्रक मध्ये ठेवायचे असते. तेच ट्रक पुढे ठरलेल्या विश्रांतीच्या ठिकाणी जाऊन जेवण्याची तयारी करतात. प्रत्येक दिंडीचे ट्रक असतात म्हणून लवकरात लवकर आवरून ट्रक पुढे मार्गस्थ करावे लागतात. त्या दिवशी आषाढी एकादशी असल्याने सर्वांचे उपवास होते. उरळी देवाची येथे आम्हाला उपवासाचे जेवण दिले.पुढे साधारण ४ कि. मी चा दिवे घाट चढायचा होता. दिवे घाट म्हणजे “यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी" या अष्टांगयोगाच्या आचार ‘दिव्यातून’ जावे लागते. दिवे घाटातून संपूर्ण वारीचे अखंड दर्शन घडते. ते दृश्य डोळ्यांचे पारणे फिटवणारे असते.

एक चढ संपला की दुसरा. पुढे बघावे तर लाखो पांढरे कपडे घातले वारकरी मागे बघावे तर इतकेच वारकरी. घाटाच्या शेवटी एक १५ - २० फूट उंच विठू माऊलीची भव्य मूर्ती आहे. दिवेघाट पार करून पुढे सासवड येथे शितोळे च्या बंगल्यात आम्ही रात्री १० वाजता पोहचलो. त्या दिवशी एकूण ४० कि. मी चालले होते. सासवड म्हणजे सप्तचक्र. “मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा व शून्यचक्र" या सप्तचक्रांची जागृती ही जीवनाची गरज आहे व ती जागृती प्राणायामाने होते. प्राणायाम म्हणजे श्वासावर नियंत्रण, श्वासावर ताबा म्हणजे सासवडचा मुक्काम व परमार्थाचा मार्ग सोपान होऊन सोपानदेवांच्या समाधीचे दर्शन घ्यावे. येथेही सोसायटी च्या गाडी पार्किंग मध्ये आमची सोय होती. एक दिवस तेथेच मुक्काम होता.

[next]

पंढरपूर वारी - २३ जून २०२२


दिनांक २३.०६.२०२२, पहाटे सासवड येथून निघालो. प्रत्येक वेळी सकाळी दिंडीत सहभागी होताना सगळे वारकरी रस्त्याला हात लावून नमस्कार करतात व रात्री दिंडी सोडण्यात आधी हरिपाठ, प्रार्थना करून मगच आपल्या ठरलेल्या मुक्काम ठरल्या ठिकाणास जायला निघतात. जिथे मुक्काम असतो इथे पोहचल्यावर तुसळ घेतलेली, वीणाधरी आणि पाण्याचा हंडा घेतलेली आरती करून सर्व नमस्कार करतात आणि मगच चहा नाष्टा जेवण वगैरे करतात.

संध्याकाळी विठ्ठल मंदिर, जेजुरी येथे पोहचलो. जेजुरी म्हणजे, “ज = जितेंद्र, जोरी = जास्त त्रास न घेणे. म्हणजेच जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतो तो आनंदी होतो." इथे ही आमची राहायची व जेवणाची सोय ग्रामस्थांनी केली होती. त्या दिवशी माझ्या सोबतच्या एका वारकरी महिलेला ताप आला होता. तेथील एका भक्तांनी त्या महिलेला ताप असल्याकारणाने वाऱ्यावर झोपू नको, आमच्या घरात रहा असे सांगितले. सोबत म्हणून मी गेले. रात्री उशिरा डॉक्टर मिळाले नाही म्हणून मी तिला थंड पाण्याने अंघोळ करायला सांगितली व तिने केली. थोड्या वेळाने तिचा ताप उतरला.

[next]

पंढरपूर वारी - २७ जून २०२२


दिनांक २७.०६.२०२२, पहाटे ४ वाजता उठून आम्ही तिघे मी, भोसलेभाऊ व १ माऊली ३ - ३.५ किमी चालत जाऊन जेजुरी गड चढून श्री खंडेरायाचे दर्शन घेतले. पाऊस चालू असूनही गडावर गर्दी होती. पावसामुळे सर्वत्र उधळलेल्या भंडारा असा निसरडा झाला होता. दर्शन घेऊन ७ वाजता मुक्कामी स्थळी येऊन चहा नाष्टा घेतला व दिंडीत सामील झालो. पुढे चालत आम्ही दुपारी जेवनासाठी दौडज व वाल्हे रेल्वे गेट जवळ पोहचलो. वाल्हे म्हणजे, “भर तारुण्यात माणसाने - वाल्हे = कोमल, प्रेमळ, जिव्हाळासंपन्न झाले पाहिजे." वाल्ह्यात वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन घेतले व मुक्कामी थांबलो. इथून तंबूतला मुक्काम सुरू झाला. तंबूला पाल म्हणतात. आमचे मुक्कामाचे स्थान हे मुख्य रस्त्यापासून ४ - ५ कि. मी दूर असायचे. दर वेळी मुख्य रस्ता सोडून रात्री जावे लागायचे व सकाळी परत यावे लागायचे.

[next]

पंढरपूर वारी - २८ जून २०२२


दिनांक २८.०६.२०२२, सकाळी निघालो व नीरा येथे दुपारचे जेवण झाले. नीरा नदीवर माऊली ला स्नान घातले जाते. ज्ञानेश्वर माऊलींच्या वास्तव्याच्या ठिकाण २ - ३ कि. मी वर होते. आळंदी पासून ते लोणंद पर्यंत रस्त्यात ठिकठिकाणी अनेक ग्रामस्थ, सेवाभावी संस्था, भक्त, स्वयंसेवक हे वारकऱ्यांना चहा, नाष्टा ,जेवण, फळे, पाण्याच्या बाटल्या, इतर खायचे जिन्नस वाटप करत असतात. रजिस्टर्ड दिंडीतले वारकरी सोडून इतर स्वतंत्र जाणारे वारकरी ही हजारोंनी असतात.

त्या वारकर्‍यांना ह्या लोकांमुळे खाण्या पिण्याची सोया होत असते. परंतु रस्त्यात चालत असताना ह्या सर्व गोष्टीचे कागद, पुडे, रिकाम्या बाटल्या, केळीची साले, चहाचे कागदी कप इत्यादी असा कचरा संपूर्ण रस्त्यावर असतो. चालताना सतत पायात हा कचरा येतो. दिंडीत चालताना अनेक वारकऱ्यांच्या चपला तुटतात, पायातून निसटतात, हातातली एकखादी वस्तू पडते ती खाली वाकून उचलून घेत नाहीत. त्या वस्तू तश्याच मागे सोडून वारकरी पुढे जातात. शासनतर्फे आरोग्य, पाणी, वीज, रस्ता व सुरक्षा केली जाते.

[next]

पंढरपूर वारी - २९ जून २०२२


दिनांक २९.०६.२०२२, पहाटे उठून मी व नायकलभाऊ जाऊन माऊली चे दर्शन घ्याला गेलो. तेथे आम्हाला पहाटेची काकड आरती मिळाली. ती घेऊन तीर्थप्रसाद घेऊन परत लोण॔दला आलो. पुढे लोणंद येथे विसावा घेतला. लोणंद म्हणजे, “लो = देणे, आनंद = परमसुख. श्रीविठ्ठल भक्तीसाठी घरदार सोडून आलेला वारकरी भक्तिरसाने परमानंदी होतो व तो आनंद इतरांना देतो." वारीत सहभागी होणारा प्रत्येक वारकरी मग तो वयाने छोटा असो किंवा मोठा एकमेकाला ‘माऊली’ म्हणूनच संबोधतात.

[next]

पंढरपूर वारी - ३० जून २०२२


दिनांक ३०.०६.२०२२, लोणंदहुन सकाळी निघालो व पुढे पहिले उभे रिंगण होते. वारी सोहळ्यातील सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’. त्याचे दोन प्रकार आहेत -
१) उभे
२) गोल
वारीसोहळ्यात तीन उभी आणि चार गोल रिंगणे होतात. त्यातील दोन रस्त्याच्या उजव्या तर दोन रस्त्याच्या डाव्या बाजूला होतात. त्यांतही दोन रिंगणे जेवणापूर्वी आणि दोन रिंगणे जेवणानंतर होतात. या रिंगण सोहळ्यानंतरचा ‘उडीचा कार्यक्रम’ हा खूपच सुंदर आणि अवर्णनीय असतो. उभे रिंगण म्हणजे माऊली रस्त्यात उभी राहते व तिच्या उजव्या व डाव्या बाजूला सगळे वारकरी उभे राहून आरती, भजन करतात. पालखी सोहळ्यात ह्या वर्षी चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर व इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा व बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होते.

त्याचवेळेस एका बाजूला सगळ्या  प्रकारचे - म्हणजेच झिम्मा फुगडी, बस फुगडी, कोंबडा, गाठोडं आदी खेळ झाले. त्यात मीही भाग घेतला व तरडगाव ला रात्री पोहचलो. तरडगाव म्हणजे, “जर तू ब्रम्हानंदाचा आनंद घेतला नाहीस तर तुला जीवनात रडावे लागेल या सिध्दांताचे चिंतन करण्यासाठी पालखी - तर + रड = तरडगावला येते." येथे दिंडीतल्या वारकऱ्यांच्या घरचे व इतर नातेवाईक जेवण, नाष्टा पाण्याची सेवा करायला येतात. इथून काहीजण पुढच्या प्रवासाला आमच्या सोबत  पंढरपूर पर्यंत येतात.

[next]

पंढरपूर वारी - १ जुलै २०२२


दिनांक १.०७.२०२२, तरडगावाहून आम्ही फलटणला पोहचलो. फलटण म्हणजे, “ब्रम्हसत्यं जगन्मिथ्या। म्हणजे ब्रम्ह हे पूर्ण सत्य आहे बाकी सारे जग फोलपटासारखे मिथ्या म्हणजे टाकाऊ आहे. हा अनुभव वारकऱ्यांना फलटणला आल्यावर येतो, हे जीवनाचे सत्य समजल्यावर." फलटण ला बुधोजी कॉलेजच्या पटांगणात मुक्कामाची सोय केली होती. इथे मुबलक पाण्याची सोय दिसल्यावर लगेच आम्ही सर्वांनी आपले सगळे कपडे स्वच्छ धुता आले कारण आत्ताप्रयन्त जिथे राहायची सोय होती इथे मुबलक पाणी मिळाले नाही म्हणून रोजचे कपडे नुसते पाण्यातून काढून वळत टाकत होतो. इथे एक दिवस मुक्काम झाला.

[next]

पंढरपूर वारी - ३ जुलै २०२२


दिनांक ३.०७.२०२२, सकाळी निघून पिंपद्र ला मुक्कामी पोहचलो. लाखांनी वारकरी रस्त्याने चालत असले तरी सर्व वारकरी शिस्तीत, धक्काबुक्की न करता चालत असतात. सर्व वारकऱ्यांचा लक्ष फक्त माऊली पर्यंत पोहचायचं असते. रस्त्यांनी कुठेही पोलीस तैनात  नसतात. फक्त जिथे गावातून वारी जात असते तिथे वाहनांची कोंडी होऊ नये व माऊलीच्या रस्त्यात अडथळा येऊ नये म्हणून उभे असतात. वारकरी स्वतःहून शिस्तीचे पालन करतात हे खरंच कौतुक करण्यासारखे आहे. सकाळी निघून आम्ही बरड गावला पोहचलो. बरड म्हणजे, “संसारातील सुखदुःखादि द्वंद्वापासून मुक्त होतो. त्याचे जीवनरुपी क्षेत्र वासनेचे तृणांकूर न फुटणारे बरड जमिनीसारखे होते."

[next]

पंढरपूर वारी - ४ जुलै २०२२


दिनांक ४.०७.२०२२, बरड ला साधू बुआ चा ओढा येथे नाष्टा केला व पुढे निघालो व नंतर जेवायला थांबलो. इथे मी कधीही विसरणार नाही असा एक किस्सा घडला. आम्ही एका भक्ताच्या घरी जेवत होतो. अचानक माझ्याकडून भाजीतील मसाल्याचा गोळा खाल्ला गेला व त्यामुळे माझी जीभ भगभगायला लागली. मला काही सुचेना. पण तेथील यजमानांच्या ते लक्षात आले आणि त्यांनी लगेच मला साजूक तूप वाढले. थोड्याच वेळात माझ्या जिभेची भगभग थांबली. परत आम्ही मार्गस्थ होऊन नातेपुते गावी पोहचलो.

नातेपुते म्हणजे, “नातेपुते या गावी इतर नात्याचा मोहातून मुक्त होऊन तो फक्त श्रीविठ्ठलाचा होतो." वारीत चालत असताना म्हणायच्या अभंगांचा क्रम आणि नियम ठरलेला असतो. रूपाचे, भूपाळीचे, वासुदेव, आंधळे, पांगळे, गौळणी इत्यादी अभंग सकाळच्या वेळी, दुपार जेवणानंतर हरिपाठ, गुरूपरंपरेचे अभंग, नाटाचे अभंग वारकरी म्हणतात. ठराविक वारांचे अभंग त्या त्या दिवशी म्हटले जातात. सर्व दिंड्या एकच अभंग एकदम म्हणत नाहीत. प्रत्येक दिंडीत मात्र एका वेळी एकच अभंग ऐकू येतो. दुपारी जेवणानंतर ज्ञानोबारायांचा ‘हरिपाठ’ म्हटला जातो. हरिपाठाच्या शेवटच्या अभंगामधील शेवटचे चरण ‘ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान । समाधी संजीवन हरिपाठ॥ ‘म्हटले जाते त्यावेळी दिंडी थांबते; त्याबरोबर पालखीही थांबते आणि दिंडीतील लोक उभे राहून ते चरण म्हणतात. तेथूनच भूमीला स्पर्श करून श्री माऊलीला वंदन करतात.

[next]

पंढरपूर वारी - ५ जुलै २०२२


दिनांक ५.०७.२०२२, सकाळी आवरून चहा घेतला. इतके दिवस कडक ऊन होते. कधी तरी मधे थोडासा पाऊसलागला. सतत उन्हात चालण्याने रंग पूर्ण काळा झाला होता. पंढरपूरची वारी, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांच्या पालख्या, वारकर्‍यांच्या मनात इतकेच असते, ते ऊन-वारा-पाऊस यांची तमा बाळगत नाहीत. मांडवी ओढा येथे जेवण घेतले. तेथे एक दुःखद घटनाही घडली. एका वारकरी महिलेचे निधन झाले. सगळ्यांची अशी भावना झाली की तिला विठ्ठलाच्या दारी मरण आले.

शिंगणापूरफाटा सोडून माळशिरसला पोहचलो. महाराष्ट्राचं नव्हे तर विविध ठिकाणच्या संस्थानांच्या, विविध फडांच्या पालख्या असतात. यातील मुख्य पालख्या शेगाव येथून येणारी पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, देहूहून संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून संत निवृत्तीनाथांची, पैठणहून संत एकनाथांची तर उत्तर भारतातून संत कबिराची पालखी येते.

[next]

पंढरपूर वारी - ६ जुलै २०२२


दिनांक ६.०७.२०२२, माळशिरस म्हणजे, “माळ = साखळी + शिरस = ज्ञान = माळशिरस. पायी चालल्याने शारीरिक मुखाने नामस्मरण केल्याने वाचिक विठ्ठलध्यासाने मानसिक तपाबरोबर कीर्तन - प्रवचनाच्या श्रवणाने ज्ञानाची साखळी त्याला विठ्ठलरूप करते." इथे सकाळी “गोल रिंगण" होते. गोल रिंगण म्हणजे मोठ्या पटांगणात पालखी उभी असते व तिच्या भोवती पाहिले टाळकरी मग तुळसवाल्या मग वीणाधारी मग झेंडेधारी आणि मग इतर वारकरी असे गोल उभे असतात.

वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात. यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो. याला आदराने “माऊलीचा अश्व" असे म्हणतात. या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. पाऊसातूनही सर्व वारकरी बेभान होऊन फुगड्या, भजन, टाळ वाजविणे इत्यादी सोपस्कार करतच होते. इतर वेळी पाऊस-चिखल  आपल्याला नको वाटतात पण तेव्हा हा विचार मनाला जराही शिवला नाही ही माऊलींचीच कृपा. नंतर मार्गस्थ होऊन २ वाजता वांझोरी येथे जेवण घेतले. पुढे कडूसला आल्यावर दुसरे गोल रिंगण होते.

[next]

पंढरपूर वारी - ७ जुलै २०२२


दिनांक ७.०७.२०२२ ला आम्ही वेळापूर, ठाकुरबुआचि समाधी इथे पोहचलो. वेळापूर म्हणजे, “क्षणभर सुद्धा वेळ वाया न घालविता विठ्ठलभजन केले पाहिजे हे ज्ञान होते." इथे ३ रिंगण होते. रिंगण मध्ये माऊलीच्या पालखी च्या पुढे असलेल्या पहिल्या २५ दिंड्यातल्या वारकऱ्यांचा मान असतो. रिंगणाची सुरुवात, माऊलीचे अश्व करतात. दोन्ही अश्व (एक मोकळा, एक स्वर असलेला) रिंगणात पालखीच्या ५ प्रदक्षिणा घालतात. पालखीच्या बाजूला टाळकरी अनके रचना करून उभे राहतात, पाठीवर झोपतात, कुशीवर झोपतात, पोटावर झोपतात असे ना ना पद्धतीत वेगवेगळे तालात टाळ वाजवत असतात.

ढोलधारी त्यांचे वेगळे ताल वाजवत असतात. तुळस आणि विना धारी पालखीला प्रदक्षिणा घालत असतात. माऊलीच्या आरत्या , अभंग म्हणतात आणि मग इतर वारकऱ्यांना माऊलीचे दर्शन घेता येते. इथेच नंतर श्री माऊलींचे धाकटे बंधू श्री सोपानकाकांची पालखी वेळापूर समोरील भंडीशेगाव मुक्कामापूर्वी ‘टप्पा’ येथे येऊन श्री माऊलीस भेटते. यालाच ‘बंधुभेट’ म्हणतात. हा अतिशय भावूक प्रसंग असतो. या वेळी दोन्ही भावंडांचे रथ एकमेकांना भेटतात व मानकरी आणि विश्वस्त मंडळी दर्शन घेऊन श्रीफलांचे आदान-प्रदान करतात. मंदिरापर्यंत जाण्यासाठी पाच किलोमीटर चालावे लागले. पाऊस चालूच होता.

[next]

पंढरपूर वारी - ८ जुलै २०२२


दिनांक ८.०७.२०२२, भेंडीशेगावच्या इथे सुमारे ५ किलोमीटर चालत जाऊन “तुकाधाव" या ठिकाणी उतरलो. तुकाधाव येथे मोठी उतरण आहे. असे सांगितले जाते की पंढरपूर पासून थोड्याच अंतरावर असलेल्या वेळापूर येथील टेकडीवरून तुकाराम महाराजांना विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले म्हणून तेथून तुकाराम महाराज पंढरपूर पर्यंत धावत गेले म्हणून त्या उतरणीला तुकाधाव असे म्हणतात. जिथे वारकरी मुक्कामी असतात इथले शेतकरी आपल्या शेतातले पाण्याचे पपं विहिरीचे पपं चालूच ठवेतात जेणेकरून वारकर्‍यांना पाण्याची कमतरता होणार नाही.

असे ठिकाण आले की मी मात्र आपले कपडे स्वच्छ साबण लावून धूत होते. मागचे २,३ दिवस सतत पाऊस आणि इतक्या दिवस सतत चालत होते तरी वारकऱ्यांचा उत्साहात कुठेही कमतरता जाणवत नव्हती. पाऊस असल्याने चिखल ही होता. त्याच चिखलात ट्रक सोबत पुढे गेलेले वारकरी हे पाल (तंबू) ची व्यवस्था करतात. अक्षरशः काही ठिकाणी तर कडक जमीन येई पर्यंत फवाड्याने चिखल बाजूला करावा लागत होता. सोबत चालणारे वारकरी ही इथे गेल्यावर मदतीला लागत होते. इतके चालून आलो म्हणून आराम नाही करत बसत.

[next]

पंढरपूर वारी - ९ जुलै २०२२


दिनांक ९.०७.२०२२ ला आम्ही वखारी, पंढरपूर ला पोहचलो. वखारी म्हणजे, “वाखरीच्या मुक्कामी त्याची वाणी प्रासादिक व वाचासिद्ध होते." रस्त्याला लागूनच चहाच्या टपरी वर आम्ही जरा चहाच्या साठी व थोडी विश्रांती साठी थांबलो. चहा घेऊन आम्ही निघालो आणि साधारण २, २.५ किमी आल्यावर जोरात पाऊस आला म्हणून मी रेनकोट घायला माझ्या पिशवीत हात घातला तर रेनकोट त्यात नव्हता. पाऊस जोरात होता. इथे रस्त्यावर ट्रक उभे होते. आम्ही सर्व ट्रक खाली आडोश्याला बसलो. मी माझ्या सोबत असलेल्या वारकर्‍यांना म्हणाले की मी रेनकोट त्या चहाच्या टपरीवर विसरले. मला तो जाऊन घेऊन यावा लागेल.

मला सगळ्यांनी विरोध केला की कशाला इतक्या दूर परत जाताय. पावसासाठी हा कागद घ्या. पण माझे मन मनात नव्हते, करण तो रेनकोट मला माझ्या मुलांनी माझ्या काळजीपोटी आणून दिला होता. मग काय मी त्यानां म्हणाले तुम्ही पुढे व्हा मी जाऊन येते. भोसले भाऊ मला म्हणले की ते रिंगण चालू होण्याच्या आधी थांबतो तुम्ही या कारण पुढे रिंगणात चुकामुक होण्याची शक्यता होती आणि तिथून आमचे विश्रांतीच्या ठिकाण हे रस्ता सोडून ५ कि. मी आत गावात होते.

चालून चालून पायांना फोड आले होते. बुटांचे सोल फाटले होते म्हणून मी स्लिपर घातली होती. पण स्लिपर ने मला पटपट चालता येत नव्हते म्हणून मी स्लिपर पिशवीत ठेवली व अनवाणी चालू लागले. २, २.५ किमी चालल्यावर ती चहाची टपरी दिसली. त्या मालकाना विचारले की माझा रेनकोट इथे विसरले तर तो आहे का? त्यांनी बाजूला ठेवलेला माझा रेनकोट मला लगेच दिला. मी तडक परतीची वाट धरली आणि ठरल्या प्रमाणे रिंगणाच्या आधी भोसले भाऊची भेट झाली. इथे उभे रिंगण झाले. असा दिवस भराचा पावसात भिजत प्रवास करून आम्ही वखारी, पंढरपूरला रात्री ९.३० ला पोहचलो.

आमच्या मुक्कामाचे ठिकाण मुख्य मंदिर (माऊलीच्या पालखी) पासून २,२.५ कि. मी वर होते. इथे ही खूप चिखल होता. चिखलात चप्पल ही रुतत होती. त्या काळोखात, भर पावसात आमच्या दिंडीच्या स्वयंसेवकांनी (जे स्वतः ही आमच्या सोबत चालत होते) सर्व वारकऱ्यांना सांगितले की तुम्ही कोणी आपल्या पालातुन बाहेर येऊ नको. आम्ही तुम्हाला चहा, जेवण सर्व पालामध्येच आणून देतो व त्यांनी आम्हा सर्वाना जेवण हातात आणून दिले.

[next]

पंढरपूर वारी - १० जुलै २०२२


दिनांक १०.०७.२०२२, पंढरपूर. माऊलीची पालखी आदल्या दिवशीच मंदिरात असते. आज एकादशी होती. पंढरपुरात जणू लाखोंचा जनसागर लोटला असतो. आषाढी एकादशीच्या हाटे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सपत्निक विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करतात. याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे. त्यांच्या बरोबरच वारकरी समुदायातील एका दांपत्याला प्रतिवर्षी पूजेचा मान मिळतो. असा मान मिळणे वारकरी संप्रदायात आदराचे समजले जाते.

विठुरायाच्या दर्शनाला अनेक भाविक आले असतात. मागचे १८,२० दिवस माऊली वारकऱ्यांच्या सोबतच असते म्हणून दिंडीतले वारकरी मुख्य मंदिरात जात नाहीत, कळसाचे दर्शन घेतात. पहाटे उठून आम्ही चंद्रभागा नदी मध्ये स्नानाला गेलो. नंतर भागिरथी नदीवर जाऊन स्नान केले. तेथे स्नानासाठी तुकोबाची पालखी आली होती. मी डोक्यावर तुळस घेऊन पालखीला प्रदक्षिणा घातली व पादुकांवर डोकं ठेवून सोवळ्याने नमस्कार करता आला. तिथेच एक मंदिर आहे ज्या ठिकाणी विठोबा येऊन ताक प्यायचे त्या ठिकाणचे दर्शन घेतले. तसेच तेथे असलेल्या रुक्मिणी, कृष्ण, शंकर आदी सर्व मंदिरात जाऊन दर्शन घेतले. लाखोंची गर्दी असली तरी प्रत्येक दिंडीतले लोक आपल्या दिंडीतल्या वारकऱ्यांची काळजी घेत होते व कुठेही धक्काबुक्की होणार नाही याची संपूर्ण दक्षता घेत होते.

भागीरथीच्या तीरावर वारकऱ्यांचे वेगवेगळे खेळ चालू असतात. त्यात एक मजेशीर खेळ म्हणजे, एका बाजूला ८, १० वारकरी उभे असतात आणि मध्ये थोडे अंतर ठेवून समोर ८, १० उभे राहतात. एका बाजूचे वारकरी कधी उड्या मारत, उठाबशा काढत, सूर्यनमस्कार करत, साष्टांग नमस्कार करत समोरच्यांपर्यंत जातात. तिथे त्यांना नाम ओढतात आणि तसेच उड्या मारत परत आपल्या जागी येऊन उभे रहातात. त्याला प्रतिउत्तर म्हणून समोरचे वारकरी ही अश्याच पद्धतीने त्यांच्या पर्यंत जातात. ते सर्व दृश्य म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटवणारेच असते ज्याचे वर्णन शब्दात करता येणे खूप कठीण आहे जे फक्त अनुभवूच शकतो.

आमच्या दिंडी मध्ये एक वृद्ध अंध वारकरी होते, जे गेले अनेक वर्षे वारी करत होते. ते उत्कृष्ट ढोलवादक ही होते. एका रिंगणाच्या ठिकाणी त्यांना एका दुसऱ्या ढोलवदकाच्या खांद्यावर उभे केले. त्यांना वर कुठला ही आधार नव्हता तरी त्यांनी इथे उभे राहून उत्कृष्ट ढोलवादान केले. तसेच एक तिसरीतला लहान मुलगा होता. त्याच्या वडिलांना सोबत आला होता. तो आमच्या सोबत इतके दिवस चालतच पंढरपूर पर्यंत आला पण एकही दिवस त्याने तक्रार केली नाही की मला चालायचे नाही की मी दमलोय, मला भूक लागली आहे. जिथे जसे आम्ही जात होतो, जेव्हा जेवत होतो, विश्रांती घेत होतो तो ही तेव्हाचं थांबायचा. विशेष म्हणजे दिंडीतल्या सर्व खेळांमध्ये तो उत्साहाने भाग घेत होता. तसेच एक ९२ वर्षाचे वृद्ध वारकरी संपूर्ण दिंडी चालले. आमचे दिंडी प्रमुख, श्री अण्णा, वय ७५ वर्षे यांचे आभार आणि कौतुक आवर्जून करावे असे आहे.

कुटुंब प्रमुखाप्रमाणे सर्व घरातल्यांनी काळजी घेत होते. दिंडीतले सर्व वारकरी जेवले की नाहीत,चहा, नाष्टा केला की नाही याची जातीने चौकशी करत होते आणि सर्व वारकऱ्यांचे जेवण झाले की मगच ते जेवण करत असत. दिंडीत असताना महिला वारकरी एकमेकींना डोक्यावर तुळस, पाण्याचा हंडा घेण्यास देतात. या महिला वारकऱ्यांचे ही कौतुक, दिवसभर पायी चालून सुद्धा मुक्कामी पोहचल्यावर थोडी विश्रांती घेऊन लगेच स्वयंपाकाला लागायच्या. २०० - २५० वारकऱ्यांच्या कधी चपात्या, कधी भाकऱ्या करत असत.

दिवसभर आजूबाजूच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले व संध्याकाळी मार्केटला जाऊन थोडी खरेदी केली. घरी देण्यासाठी प्रसाद घेतला व रात्री माझ्या पालात येऊन झोपले. ही रात्र माझ्या दिंडीची वारी शेवटची रात्र होती. आता झोपताना मात्र सकाळी कसे परत जायचे याचा विचार होता कारण पंढरपूरला इतकी गर्दी होती की ज्यादाच्या बस गाड्या ही भरून जात होत्या. त्यात पंढरपूर दर्शन हे आयुष्यात पहिल्यांदाच केले त्या मुळे तिथल्या दळणवळणाची साधने माहिती नव्हती, असे सगळे विचार करत झोपले.

[next]

पंढरपूर वारी - ११ जुलै २०२२


दिनांक ११.०७.२०२२, सकाळी उठलो, चहा झाला. आदल्या दिवशी चा उपवास सोडून परतीच्या प्रवासासाठी विचारणा सुरू झाली. त्या वेळी माझ्या दिंडीतले विणाधारी माऊलींनी विचारले की तुमचा रेनकोट मला वीणाला बांधायला देता का? परत जाताना पावसात भिजेल, रेनकोट मध्ये बांधून नेली तर सुरक्षित राहील. मी एक क्षण विचार केला कारण मुलांनी रेनकोट प्रेमाने दिला होता आणि दुसऱ्या क्षणी विचार आला की टपरीवर चुकून सोडून आलेला रेनकोट बहुतेक ह्या वीणा सुरक्षित नेण्यासाठी लागणार होता म्हणूनच माउलींनी मला परत पाठवून तो मिळवून दिला.

“तूच दिलेस, तुलाच अर्पण" म्हणून मी तो रेनकोट विणाधारीच्या स्वाधीन केला आणि माझ्या कडून ही सेवा करून घेतली म्हणून मनोमन माऊलींचे आभार मानले. भोसले भाऊ व दिंडीतले तातोबा यशवंत दवणे (वय ९२) मला बस मध्ये बसवून देण्यास आले. साधारण ३ कि. मी चालत आलो आम्ही आणि १.५ ,२ तास बस स्थानकात फिरून मला जाण्यायोग्य बस शोधत होतो. शेवटी मला सुमारे १०.३० ला ‘पंढरपूर - अर्नाळा’ बस मिळाली. बसायला जागाही मिळाली.

भोसले भाऊ आणि तात्या मला सुखरूप बस मध्ये बसवून परत ३ कि. मी चालत दिंडी मुक्कामी गेले. ते व दिंडीतले काही इतर वारकरी दुसऱ्या दिवशी (१२.०७.२०२२) ला परतीच्या प्रवासाला परत पायी ( पंढरपूर ते आळंदी) निघणार होते. वारी करताना जागोजागी पावलापावलांवर दानशूर लोक सोयी सुविधा उपलब्ध करून देतात. मात्र ‘परतवारी‘ च्या वेळी अतिशय कष्टप्रद प्रवास करावा लागतो. वारीला ग्लॅमर आहे, तर ‘परतवारी’ला लाट ओसरून गेल्यानंतरचं वातावरण.

गर्दी असल्याने बसला बस स्थनाकातून निघायला साधारण २ तास लागले आणि सुमारे १२ - १२.१५ ला बस मार्गस्थ झाली. हुश्श! माझा जीव भांड्यात पडला. घरी मुलांना बस मिळाल्याचे कळवले. मुलांनी सांगितले की ठीक आहे. आम्ही तुला घ्यायला येऊ, काही काळजी करू नकोस. दोघेही थोड्या थोड्या वेळाने मी कुठवर आले हे बघत होते. पुण्यापर्यंत आल्यावर मी त्यांना म्हणले की आता मी ठाण्याला आले की कळवेन. रात्री १२ - १२.३० ला ठाण्याला पोहचल्याचे मुलांना कळवले. मुलाने मला विरारफाट्याला उतरायला सांगितले. इथे आम्ही येऊ. ठाणे ते विरारफाटा साधारण २ - २.५ तास लागणार होते. माझी दोन्ही मुलं वेळेच्या आधीच (२.५० वाजता) येऊन विरारफाट्यावर उभी होती.

मी बाहेर काही खाणार नाही आणि खूप पाऊस असल्याने मुलीने माझ्या साठी थरमास मध्ये गरम गरम दूध (हळद घालून ) बिस्कीट आणले होते. मला बस मध्ये थंडी वाजली असेल म्हणून सोबत स्वेटर, पायमोजे आणि पांघरूण आणले होते. पहाटे ५ वाजता आम्ही घरी पोहचलो. घरी आल्यावर मिस्टरांनी अंघोळीसाठी गरम पाणी करून दिले व गरमागरम चहा दिला. मी जवळ पास २०,२२ दिवसानी मनसोक्त अंघोळ केली, चहा घेतला आणि थोड्या वेळ जाऊन झोपले. सकाळी ९ वाजता उठले आणि एरवी घरी असताना जशी काम करायचे तशी कामाला लागले. मला जरा सुद्धा थकवा जाणवला नाही. ही सगळी माऊलींचीच कृपा जी त्याने मला इतकी शक्ती दिली की मी ही वारी संपूर्णपणे (चालत, न आजारी पडता) पूर्ण करू शकले.

दिंडीत गेले तरी माझ्यातली समाजसेविका मागे राहणारी नव्हती. प्रवासात कोणाला चक्कर आली, कोणाचा पाय मुरगळला, डोकं दुखत होते त्यांना मी ‘एक्युप्रेशर’ दिले. कोणाला सर्दी, खोकला होता त्यांना ओव्याने शेकून दिले. त्यांना त्यांच्या आजीची आठवण झाली असे सांगत. माझ्या सोबतच्या एक महिला वारकरीला खूप सर्दी, खोकला, ताप होता. त्या परिस्थितीत मी तिला डॉक्टर कडे घेऊन गेले. सध्याच्या परिस्थितीत ‘कोरोना’ ची भीती होती तरी मी काही त्या गोष्टींची पर्वा केली नाही आणि माझ्या कडून जितकी सेवा होऊ शकते तितकी केली.

ज्ञानोबा माऊलीच्या जे मनात असते ते ती करते. वारीला जायच्या विचारा पासून ते वारीहून येई पर्यंत ह्याचा मला चांगलाच अनुभव आला तो मी माझ्या शब्दांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. २२ दिवसाचे दिंडी वर्णन जेवढे सविस्तर सांगता आले तेवढे सांगितले. सर्व प्रवास करत असताना मी रोज थोडक्यात वर्णन (ठिकाण, वेळ वगैरे) माझ्या मोठ्या बहिणीला (सौ. मंगला अनिल तोरणे) हिला सांगत होते. हे दिंडी वर्णन तिच्यामूळे व माझे भाऊजी (श्री अनिल रामचंद्र तोरणे) यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिले. तसेच माझ्या आई, वडिलांचे आशिर्वाद, माझ्या नातेवाईकांचे प्रोत्साहन, कौतुक, घरातले व दिंडीतल्या सर्व वारकऱ्यांचे प्रामुख्याने नायकल भाऊ आणि भोसले भाऊ यांनी तर मला त्यांच्या लहान बहिणी सारखे सांभाळून सुखरूप आणले व ही माझी वारी पूर्ण केली, त्या सर्वांचे मनापासून आभार मानते.

‘जय हरी विठ्ठल’ अशीच देवाची कृपा मी व माझ्या कुटुंबावर, मित्र परिवारावर असूदे.

‘ज्ञानोबा-तुकाराम’ हे भजन म्हणजे मध्यमपदलोपी समास आहे. या दोन नामात माऊलींपूर्वीचे आणि तुकोबारायांनंतरचे व या दोहोंच्या दरम्यानचे संप्रदायातील सर्व संत सामावलेले आहेत; असा हा वारीचा नयनरम्य सोहळा डोळ्यात साठवून ठेवावा असाच असतो. म्हणून जीवनात प्रत्येकाने एकदा तरी वारी अनुभवावी असे सांगितले जाते. म्हणूनच महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी आता अनेकांच्या सशोधनाचा, शिस्तीचा आणि पीएचडीचा विषय बनली आहे, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच वारीला महाराष्ट्रातील एक प्रमुख सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व प्राप्त झाले आहे. यामुळे महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा स्पष्टपणे अधोरेखित होते.

- जाई नाईक

अभिप्राय

  1. मला सहभागी व्हायचे असेल तर मुंबईतून कसे जावे यासाठी कुठे संपर्क साधावा?

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,8,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1386,अभिषेक कातकडे,5,अभिषेक घुगे,1,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,7,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अरुण म्हात्रे,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1132,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,8,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,15,आदर्श कामिरे,4,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,281,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमा पाटील,1,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,12,करण विधाते,1,करमणूक,72,कर्क मुलांची नावे,1,कल्पना देसाई,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,280,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,9,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,20,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,55,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,432,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,63,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री कांबळे-शिंदे,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,76,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,3,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,71,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,16,निवडक,9,निसर्ग कविता,37,निसर्ग चाटे,2,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,40,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,15,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,2,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,10,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,9,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,23,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाग्यवेध,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,9,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1173,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,30,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,19,मराठी टिव्ही,53,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,7,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,20,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,48,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,288,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,145,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,11,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,88,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मिलिंद खांडवे,1,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,8,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,25,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकारण,2,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,15,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वादळे झेलतांना,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,5,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,17,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,9,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,11,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,14,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पंडित,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,33,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,8,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,24,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,1,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,128,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,4,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्ना पाटकर,1,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,2,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हितेशकुमार ठाकूर,1,हिरवळ,1,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,marathimati,1,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: पंढरपूर वारी - एक अविस्मरणीय अनुभव - अनुभव कथन (जाई नाईक)
पंढरपूर वारी - एक अविस्मरणीय अनुभव - अनुभव कथन (जाई नाईक)
पंढरपूर वारी - एक अविस्मरणीय अनुभव - अनुभव कथन (जाई नाईक) - ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता सतत २१ दिवसांच्या पंढरपूरच्या पायी वारीचा मी घेतलेला अनुभव.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjyzp5aQdV-fw61Dhh31lz7S6Z070229CamTilPfPJwgxIAbqIapDaKS1DwJGXVWp0uWhM984YfYf7NIbSUQalQAVCdNsZ1I2i1L9We_ISF34MfXmE-yKtFc0oYzl29Drd6gqqwokFNEGeu_Baz90N0uGtH0TctDnsg-Do08Lw6ueYBRZ9VIR50_KaHBA/s1600-rw/pandharpur-wari-anubhav.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjyzp5aQdV-fw61Dhh31lz7S6Z070229CamTilPfPJwgxIAbqIapDaKS1DwJGXVWp0uWhM984YfYf7NIbSUQalQAVCdNsZ1I2i1L9We_ISF34MfXmE-yKtFc0oYzl29Drd6gqqwokFNEGeu_Baz90N0uGtH0TctDnsg-Do08Lw6ueYBRZ9VIR50_KaHBA/s72-c-rw/pandharpur-wari-anubhav.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2022/08/pandharpur-wari-anubhav.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2022/08/pandharpur-wari-anubhav.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची