Loading ...
/* Dont copy */

स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२

स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२ - स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२ मध्ये होणार गजर अष्टविनायकाचा [Star Pravah Parivar Ganeshotsav 2022].

स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२

स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२ मध्ये होणार गजर अष्टविनायकाचा


स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२

स्टार प्रवाह परिवारातले १०० कलाकार एकत्र येऊन साजरा करणार कलेच्या दैवताचा उत्सव


गणपती बाप्पा हे आपल्या सर्वांचच लाडकं दैवत. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर’ या म्हणत आपण वर्षभर बाप्पाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असतो. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.

लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा परिवार सज्ज आहे. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२ या गणपती विशेष कार्यक्रमात यंदा अष्टविनायकाचा गजर होणार आहे. स्टार प्रवाह परिवारातील १०० कलाकार एकत्र येऊन अष्टविनायकाच्या कधीही न ऐकलेल्या कथा नृत्य आणि गोष्टीच्या माध्यमातून सादर करतील. आजीच्या गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे झालो.

हे मंतरलेले दिवस या गणपती विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा अनुभवता येतील. स्टार प्रवाह परिवारातल्या बच्चेकंपनीला अष्टविनायकाच्या या कथा आजीच्या तोंडून ऐकायला मिळणार आहेत. मराठी टेलिव्हिजन विश्वात असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीने ‘मराठी परंपरा मराठी प्रवाह’ हे ब्रीदवाक्य प्रत्येक कार्यक्रमातून जपलं आहे. त्यामुळे गजर अष्टविनायकाचा हा कार्यक्रम देखिल पुन्हा एकदा मराठी परंपरेचं दर्शन घडवेल. या कार्यक्रमात गणपतीच्या आवडीच्या पाच गोष्टींवर आधारित एक खास गाणं देखिल बनवण्यात आलं आहे.

मी होणार सुपरस्टार आवाज कुणाचा महाराष्ट्राचा मधील स्पर्धकांच्या आवाजाने हे गाणं नटलं आहे. अष्टविनायकाच्या कथांसोबतच सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचा आस्वादही प्रेक्षकांना घेता येणार आहे. त्यासोबतच नंदेश उमप यांनी सादर केलेला लोककलेचा जागर या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवेल.

स्टार प्रवाह परिवाराचा गणपती असल्यामुळे या परिवाराचा अतिशय महत्त्वाचा भाग असणाऱ्या प्रेक्षकांना या कार्यक्रमाचं खास निमंत्रण आहे. रविवार २८ ऑगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल.

तेव्हा पाहायला विसरु नका रविवार २८ ऑगस्टला दुपारी १२ वाजल्यापासून स्टार प्रवाह परिवार गणशोत्सव २०२२.


स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२२ (व्हिडिओ)




मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची