Loading ...
/* Dont copy */

अकारण - मराठी कविता (मनोज शिरसाठ)

अकारण (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी मनोज शिरसाठ यांची अकारण ही मराठी कविता (Akaran Marathi Kavita).

अकारण - मराठी कविता (मनोज शिरसाठ)

अकारण पेटवत नसते रान, स्वतःच स्वतःला...


अकारण - मराठी कविता (मनोज शिरसाठ)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीमनोज शिरसाठ’ यांची ‘अकारण’ ही मराठी कविता.



अकारण
पेटवत नसते रान
स्वतःच स्वतःला
वणव्याच्या स्वाधीन करते
अगदी हिरव्या झाडांसकट...

मी मात्र मुळापासून, शेंड्यापर्यंत वाळल्यावरही
का उन्मळून पडत नाही...

भुतकाळातील सुवर्णपाने
वर्तमानाच्या भग्न वाड्यात
देहाच्या झोपाळ्यावर बसून
का म्हणून मी निस्तेज झालेल्या डोळ्यांनी वाचत बसतो...

देहाला समजतच नाही का
निर्माल्याची भाषा...?
पायंतळी तुडवले जाउनही
आत्म्याने का सोडू नये
भग्न देहाच्या गाभार्याची आशा...?

म्हणूनच...
फक्त पडून रहायचे लाचारपणे
देहाच्या कोषात...
अगदी जगाला नकोसे झाल्यावरही,
किंवा स्वतःला नकोसे झाल्यावरही...
कदाचित हा तहच झालेला असावा,
आत्म्याचा आणि देहाचा...


अकारण - मराठी कविता (मनोज शिरसाठ) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- मनोज शिरसाठ

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची