Loading ...
/* Dont copy */

महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (Maharashtra Shaheer Marathi Movie World Television Premiere).

महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

महाराष्ट्र शाहीर म्हणजे मराठी अस्मितेचा बुलंद आवाज...


महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

(Maharashtra Shaheer Marathi Movie World Television Premiere) प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर.



लोककला म्हण्टलं की शाहीर साबळेंचं नाव आपसुकच डोळ्यासमोर उभं रहातं. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचं फार मोठं योगदान आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले. शाहीर साबळे हे गीतकार, लोकनाट्याचे लेखक, विनोदवीर, नाट्यदिग्दर्शक, उत्तम गायक, उत्तम छायाचित्रकार आणि ढोलकी वादक अशा अनेक भूमिकांमधून महाराष्ट्राला भेटत राहिले. अश्या या बहुआयामी कलावंताची गोष्ट महाराष्ट्र शाहीर या सिनेमातून मांडण्यात आली आहे. रविवार १८ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आणि रात्री ९ वाजता प्रवाह पिक्चरवर या बहुचर्चित सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पहाता येणार आहे.

महाराष्ट्र शाहीर
महाराष्ट्र शाहीर

सुपरस्टार अंकुश चौधरी यांनी या सिनेमात शाहीर साबळेंची भूमिका साकारली आहे. याविषयी सांगताना अंकुश चौधरी म्हणाले, ‘या सिनेमाच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच चरित्रपटात काम केलं आहे. माझ्या कारकिर्दीमध्ये शाहीर साबळेंचा मोलाचा वाटा आहे. आपल्या आयुष्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिवर सिनेमा बनणं आणि त्या सिनेमात आपल्यालाच त्या व्यक्तिची भूमिका साकारायला मिळणं यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. अश्या या थोर कलावंताच्या आयुष्यावर बेतलेला महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा घरबसल्या प्रवाह पिक्चरवर पहाता येणार आहे याचा मनापासून आनंद आहे.’

महाराष्ट्र शाहीर
महाराष्ट्र शाहीर

महाराष्ट्र शाहीर सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शाहीर साबळे यांचे नातू आणि मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सांभाळली आहे. तर केदार शिंदे यांची लेक सना शिंदेने शाहीर साबळे यांच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची भूमिका साकारली आहे. यासोबतच निर्मिती सावंत, मृण्मयी देशपांडे, अश्विनी महांगडे, अमित डोलावत, शुभांगी सदावर्ते, अतुल काळे आणि दुष्यंत वाघ अशी तगडी कलाकारांची फौज सिनेमात आहे.

मराठीचा स्वाभिमान आयुष्यभर जपणारे, मराठी लोकसंगीत आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवणारे शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या महाराष्ट्र शाहीर या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर पाहायला विसरु नका रविवार १८ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता आणि रात्री ९ वाजता फक्त प्रवाह पिक्चरवर.


Maharashtra Shaheer Official Trailer (व्हिडिओ)





महाराष्ट्र शाहीर सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची