Loading ...

ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर - २५ सप्टेंबरला प्रवाह पिक्चरवर ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर.

ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

२५ सप्टेंबरला प्रवाह पिक्चरवर पाहा ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

२५ सप्टेंबरला प्रवाह पिक्चरवर पाहा ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर दृष्ट लागावी अशी चंद्रा-दौलतची प्रेमकहाणी पहिल्यांदाच पाहायला मिळणार तुमच्या घरातील टीव्हीच्या पडद्यावर



सुपरहिट सिनेमांची मेजवानी देत प्रेक्षकांचा रविवार खास बनवणाऱ्या प्रवाह पिक्चरवर २५ सप्टेंबरला ब्लॉकबस्टर चंद्रमुखी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर भेटीला येणार आहे. लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीवर हा सिनेमा बेतलेला असून राजकारणी दौलत देशमाने आणि लावणी कलावंत चंद्रा यांची प्रेमकहाणी सिनेमात पाहायला मिळेल.

या सिनेमातलं चंद्रा हे गाणं आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अजय-अतुलचं संगीत आणि चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकरच्या दिलखेचक अदांनी या गाण्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. चंद्राच्या या अदा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहेत.

पदार्पणातच प्रवाह पिक्चर वाहिनीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. पावनखिंड, झिम्मा, कारखानिसांची वारी, स्टेपनी, बळी या सिनेमांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नंतर आता उत्सुकता आहे चंद्रमुखी सिनेमाची. तेव्हा चंद्राची जादू पुन्हा एकदा अनुभवायला सिद्ध व्हा. २५ सप्टेंबरला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर.


चंद्रमुखी मराठी चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर (व्हिडिओ)




मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची