Loading ...

शेवटचा लाडू - मराठी कविता (विंदा करंदीकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर) यांची शेवटचा लाडू ही लोकप्रिय मराठी कविता.

शेवटचा लाडू - मराठी कविता (विंदा करंदीकर)

सुटी संपली नी चाललो गावाहुन दूर...शेवटचा लाडू

शेवटचा लाडूा

विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर)

सुटी संपली नी चाललो गावाहुन दूर; आणिक तव नयनी लोटला अश्रुंचा पूर. ताप जरी होता तरी पण जागुनिया रात्री मी निजता करिशी तयारी मजसाठी सारी; आणिक हे लाडू तुला मी ‘नको, नको’ म्हणता, नकळत मज भरिशी डब्यातुन तो भरता भरता तेच तुझे लाडू सुखाने मी पुरवुन खाता, आज उरे मागे तयातिल आवडता सरता. वाटतसे घाई कशाला मी इतकी केली? नाही तर असते अधिकसे उरले या वेळी. खाऊ नये वाटे तरी पण शिरतो तोंडात, आणिक मज भासे तुझा हा भरवितसे हात. तू असशी जवळी दूर ना दूर कोकणात; तू भरवित असशी तुझ्या मी बसलो ताटात छे, चुकले, गेले; संपला शिल्लक जो होता. छे, चुकले, आता भास ना प्रेमळ तो पुढता. उजाडेल उद्या आणखी माधुकरी आली; उजाडेल उद्या आणखी वारावर पाळी. उजाडेल उद्या आणखी भूक मला खाई; उजाडेल उद्या आणखी लाडू मज नाही मिळेल जो मजला उद्या, तो मी गिळणे घास मिळेल ना कोठे असा हा, आई, तव भास!

विंदा करंदीकर यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची