Loading ...
/* Dont copy */

माझे घड्याळ - मराठी कविता (विंदा करंदीकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर) यांची माझे घड्याळ ही लोकप्रिय मराठी कविता.

माझे घड्याळ - मराठी कविता (विंदा करंदीकर)

घड्याळ माझे नवे असे, सुंदर दिसते पहा कसे...माझे घड्याळ

माझे घड्याळ

विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर)

घड्याळ माझे नवे असे; सुंदर दिसते पहा कसे! दादाचे तर जुने मुळी; झुरळांची वाटे खोली! घड्याळ माझे लखलखते; सांगा कोणाचे आवडते? ‘उगाच वटवट बोलु नये; कटकट कोणा करू नये’ तूच नाहि का म्हणत असे? किटकिट त्याची सदा असे. दिवसा किटकिट, रात्री किटकिट, घड्याळ माझे गुणी मुळी कटकट कधी ना करी खुळी! गडबड करिता मार मिळे, हेहि न त्याला कसे कळे? रात्री निजण्याच्या वेळी दादा त्याचा कान पिळी; कुरकुरते, परि ना खळते, रागाने चिडूनी जाते; झोप लागते दादाला, ते नच खपते पण त्याला; पहाट होता गुरगुरते, दादाला जागे करते. दादा उठतो; चिमटा घेतो; तेव्हा मग ते गप्पा बसे; घड्याळ माझे कधी न असे! रात्री नशिबी कोनाडे; दिवसा करिते पुढेपुढे. उगाच बसते ऐटित हालवीत अपुले हात; लहानमोठे हात तसे पाहुन येई मला हसे. लाज तयाला ना त्याची; खोड कोठची जायाची? हात असे फिरवुन आधी मोडुन घेते कधीकधी! वैद्य आणुनी, हात जोडुनी, दादा देतो पुन्हा जरी, फिरवित बसते हात तरी! घड्याळ माझे परी पहा; चाळा त्याला मुळी न हा. घड्याळ दादाचे, आई, सर्वांना करिते घाई. खेळ रंगला असे जरी मधेच दादा पुरा करी. गोष्ट न राजाची सरली; बाबा म्हणती, ‘छे, झाली.’ घड्याळ असले कुणास सुचले? घड्याळ माझे गुणी परी, किती वाजले पहा तरी! सकाळचे अवघे सात; म्हणती खेळा बागेत.

विंदा करंदीकर यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची