Loading ...

ऊन हिवाळ्यातील शिरशिरता - मराठी कविता (विंदा करंदीकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर) यांची ऊन हिवाळ्यातील शिरशिरता ही लोकप्रिय मराठी कविता.

ऊन हिवाळ्यातील शिरशिरता - मराठी कविता (विंदा करंदीकर)

ऊन हिवाळ्यातील शिरशिरता, स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर...

ऊन हिवाळ्यातील शिरशिरता

विंदा करंदीकर (गोविंद विनायक करंदीकर)

ऊन हिवाळ्यातील शिरशिरता स्थितप्रज्ञ काळ्या दगडावर, मला वाटते क्षणभर फुटतो दगडाला इच्छेचा अंकुर. ऊन हिवाळ्यातील हळदीचे किरिट घालते वृद्ध वडावर! मला वाटते तळ्यांत पाहुन हात फिरवितो तो दाढीवर! ऊन हिवाळ्यातील कुडकुडते, कुशीत शिरते दिसता डोंगर; मला वाटते त्यालाही मग गरम झऱ्याचा फुटतो पाझर. ऊन हिवाळ्यातील भुळभुळते आजीच्या उघड्या पाठीवर; तिच्या भ्रमाला गमते आपण पुन्हा जरीचा ल्यालो परकर. ऊन हिवाळ्यातील हिरमुसते; रुसते; अन माळावर बसते; मला वाटते त्यालाही पण असेच भलते वाटत असते

विंदा करंदीकर यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची