Loading ...

मुक्या जिवांचे दु:ख - मराठी कविता (विठ्ठल वाघ)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी विठ्ठल वाघ यांची मुक्या जिवांचे दु:ख ही लोकप्रिय मराठी कविता.

मुक्या जिवांचे दु:ख - मराठी कविता (विठ्ठल वाघ)

कोरडे जे शेत आहे, ओलित झाले पाहिजे


मुक्या जिवांचे दु:ख - मराठी कविता (विठ्ठल वाघ)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी विठ्ठल वाघ यांची मुक्या जिवांचे दु:ख ही लोकप्रिय मराठी कविता.



कोरडे जे शेत आहे
ओलित झाले पाहिजे
मुक्या जिवांचे दु:ख ह्या
बोलीत आले पाहिजे

छते ऊन्हाची घराला,
नांदते जीव पोळती
फुफाट्याच्या वाहणा
पायांमधूनी घालती
दाह त्यांच्या वेदनांचे
झेलीत गेले पाहिजे

आभाळ अंतरातले
सोसतांना फाटलेले
अश्रू दो डोळ्यांतले
गाळतांना दाटलेले
महापूरांना बांध ह्या
घालीत गेले पाहिजे

नांगरल्या शेतापरी
काळीज दु:ख साहते
तरी सुगीचे डोलत्या
स्वप्न हिरवे पाहते
अर्थ ह्या स्वप्नातही
पेरीत गेले पाहिजे
मुक्या जिवांचे दु:ख ह्या
बोलीत आले पाहिजे

- विठ्ठल वाघ

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची