Loading ...

मनभावन हा श्रावण (मराठी कविता)

मनभावन हा श्रावण (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री अश्विनी तासगांवकर यांची मनभावन हा श्रावण ही मराठी कविता.

मनभावन हा श्रावण (मराठी कविता)

रिमझिम रिमझिम, श्रावणाच्या धारा...


मनभावन हा श्रावण (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘अश्विनी तासगांवकर’ यांची ‘मनभावन हा श्रावण’ ही मराठी कविता.



रिमझिम रिमझिम
श्रावणाच्या धारा
ऊनपावसाचा खेळ
खेळतो हा न्यारा
खट्याळ हा श्रावण
सखा माझा खरा
श्रावण सखीच्या मनी
भरून राहिला

कधी फुलपाखरू
मुक्त बागडणारा
कधी पाण्याचा प्रवाह
दुडूदुडू धावणारा
नाजूक कळीपरी
वेलीवर झुलणारा
श्रावण निरागस
मनात भरला

रानवनातुन वारा
साद घालणारा
आकाशी उडत
मंजुळ नाद करणारा
गंध फुलांचा
वाऱ्यावर वाहणारा
स्वछंदी श्रावण
मनी भरून राहिला

कधी पावसाचा थेंब
लयबद्ध नाचणारा
वाऱ्याच्या तालावर
वृक्ष डोलणारा
आनंदाचे रंग
चराचरी भरणारा
श्रावण कुशल
कलाकार आहे खरा

कधी रुसणारा
मेघआड लपणारा
कधी धीरगंभीर
सागर गर्जणारा
हिरवी राने फुलवणारा
वात्सल्याचा झरा
श्रावण मनभावन
बहुरूपी खरा


मनभावन हा श्रावण (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- अश्विनी तासगांवकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची