हा पाऊस - मराठी कविता

हा पाऊस, मराठी कविता - [Ha Paaus, Marathi Kavita] हा पाऊस म्हणजे थेंबातुन प्रश्नांची सरबत्ती, मी काय खुलासे करु नभाला इतकी भिजल्यावरती.

हा पाऊस म्हणजे थेंबातुन प्रश्नांची सरबत्ती, मी काय खुलासे करु नभाला इतकी भिजल्यावरती

हा पाऊस म्हणजे थेंबातुन प्रश्नांची सरबत्ती
मी काय खुलासे करु नभाला इतकी भिजल्यावरती

मी रोज नव्याने वाचु पहाते पाण्याची अक्षरे
हा पाऊस काही नवेच लिहितो माझ्या रस्त्यावरती

ही झाडे, वेली, गवत सारी मातीची लेकरे
हा पाऊस त्यांना अपुले म्हणतो भिजुन गेल्यावरती

हे जाणवते मज पानांमधुनी बावरते हसते कुणी
या सरी नव्हे तर हस्ताच्या गोड आठवणी बरसती

हा पाऊस आणतो आभाळातुन आठवणींची चित्रे
मज वडील दिसती पाणी पाणी उपसत दारापुढती

हा पाऊस म्हणजे थेंबकळ्यांचा गुच्छ शुभ्र चंदेरी
मी काय करु या शुभ सुखाचे कोणी नसता सोबती

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.