Loading ...
/* Dont copy */

घरी एकच पणती - मराठी कविता (वि. स. खांडेकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. स. खांडेकर (विष्णू सखाराम खांडेकर) यांची घरी एकच पणती ही लोकप्रिय मराठी कविता.

घरी एकच पणती - मराठी कविता (वि. स. खांडेकर)

घरी एकच पणती मिणमिणती


घरी एकच पणती - मराठी कविता (वि. स. खांडेकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वि. स. खांडेकर (विष्णू सखाराम खांडेकर) यांची घरी एकच पणती ही लोकप्रिय मराठी कविता.



घरी एकच पणती मिणमिणती
म्हणु नको उचल चल लगबग ती

अगणित बांधव तव अंधारी
किर्र रान! भय भवती भारी
चरणी जिवाणू भरे शिरशिरी
यमदूत न कीटक किरकिरती

काळोखाच्या भयाण लाटा
उठती फुटती बारा वाटा
फेस पसरला सारा काठा
कुणि म्हणो तारका लुकलुकती

दिवे विजेचे धानिकमंदिरी
प्रकाश पाडिती परोपरि जरी
स्नेहशून्य ते सदा अंतरी
का करिसी तयांची शिरगणती?

अखंड नंदादीपज्योती
दगडी देवा सोबत करिती
नच बाहेरी क्षणभरि येती
अप्सरा विलासी नसति सती

धाव म्हणुनि तव घेउनि पणती
हृदय नाचु दे तिजसांगाती
सोन्याचे घर - दिसते माती
रे पाहसि मागे वळूनि किती?

पहा पुढे या दीन लोचनी
रविकिरणांचे स्मरण होऊनी
आशा नाचे ज्योत दुज्या क्षणि
जरि विझे तरि करी कोण क्षिती?

- वि. स. खांडेकर (विष्णू सखाराम खांडेकर)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची