Loading ...
/* Dont copy */

येवढे द्यावे - मराठी कविता (लक्ष्मीकांत तांबोळी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांची येवढे द्यावे ही लोकप्रिय मराठी कविता.

येवढे द्यावे - मराठी कविता (लक्ष्मीकांत तांबोळी)

अनंता येवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे


येवढे द्यावे - मराठी कविता (लक्ष्मीकांत तांबोळी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांची येवढे द्यावे ही लोकप्रिय मराठी कविता.



अनंता येवढे द्यावे, फुलांचे रंग ना जावे
उडाया पाखरांसाठी, जरा आभाळ ठेवावे

घराला उंबरा राहो, पेटती राहू दे चूल
कुण्याही मायपदराशी खेळते राहू दे मूल

फुलांचा भार ना व्हावा, कधीहि कोणत्या देठा
चालत्या पावलांसाठी, असू दे मोकळ्या वाटा

तान्हुल्या बाळ ओठांचा, तुटो ना दे कधी पान्हा
असू दे माय कोणाची, असू दे कोणता तान्हा

चालता तिमिरवाटेने, सोबती चांदणे यावे
घणांचे घाव होताना, फुलांनी सांत्वना द्यावे

कितीही पेटू दे ज्वाळा, जळाचा जाळ न व्हावा
बरसत्या थेंबथेंबांचा, भुईतुन कोंब उगवावा

अनंता येवढे द्यावे, भुईचे अंग मी व्हावे
शेवटी श्वास जाताना, फुलांचे रंग मी व्हावे

- लक्ष्मीकांत तांबोळी

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची