Loading ...

कणभर तिळाची मणभर करामत - मराठी कविता (लीलावती भागवत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री लीलावती भागवत यांची कणभर तिळाची मणभर करामत ही लोकप्रिय मराठी कविता.

कणभर तिळाची मणभर करामत - मराठी कविता (लीलावती भागवत)

वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा, उडत चालले टणाटणा


कणभर तिळाची मणभर करामत - मराठी कविता (लीलावती भागवत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री लीलावती भागवत यांची कणभर तिळाची मणभर करामत ही लोकप्रिय मराठी कविता.



वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा
उडत चालले टणाटणा!
वाटेत भेटला तिळाचा कण
हसायला लागले तिघेही जण!
तीळ चालला भरभर,
थांबत नाही कुठे पळभर!
“तिळा, तिळा, कसली रे गडबड?”
“थांबायला वेळ नाही,
सांगायला वेळ नाही.
काम आहे मोठं, मला नाही सवड!”
“ऐक तर जरा, पहा तर खरा,
कणभर तिळाचा मणभर नखरा!”

“बघा तरी थाट! सोडा माझी वाट!”
“बघू या गंमत, करू या जंमत!
चला रे जाऊ यांच्याबरोबर.“
तीळ चालला भरभर, वाटेत लागले ताईचे घर.
तीळ शिरला आत, थेट सैपाकघरात.
ताईच्या हातात रिकामी परात
हलवा करायला तीळ नाही घरात!
ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून,
“घाल मला पाकात, हलवा कर झोकात.”
ताईने टाकला तीळ परातीत,
चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत,
इकडून तिकडे बसली हालवीत.
शेगडी पेटली रसरसून,
वाटाणा, फुटाणा, शेंगदाणा गेले घाबरुन!

पण तीळ पाहा कसा?
हाय नाही, हुय नाही, हासे फसफसा!
पाकाने खुलतोय, काट्याने फुलतोय!
अरे, पण हे काय? तीळ कुठे गेला?
काटेरी, पांढरा हलवा कुठून आला?
“वाटण्या फुटाण्या, शेंगदाण्या,
पाहिलीत गंमत? कणभर तिळाची मणभर करामत!
एवढासा म्हणून हसलात मला,
खुलवीन मी तर सर्व जगाला!”

- लीलावती भागवत

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची