Loading ...

अरे अरे कळसा - मराठी कविता (रा. अ. काळेले)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी रा. अ. काळेले (रामचंद्र अनंत काळेले) यांची अरे अरे कळसा ही लोकप्रिय मराठी कविता.

अरे अरे कळसा - मराठी कविता (रा. अ. काळेले)

अरे,अरे कळसा, हसून नको पाहू


अरे अरे कळसा - मराठी कविता (रा. अ. काळेले)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी रा. अ. काळेले (रामचंद्र अनंत काळेले) यांची अरे अरे कळसा ही लोकप्रिय मराठी कविता.



अरे,अरे कळसा
हसून नको पाहू
पायरीचा मी दगड
तुझाच कि भाऊ

मी तर बडा कळस
माझा किरीट झळझळीत
पायरीचा तू दगड
पडलास धूळ गिळीत

अरे,अरे कळसा
जरा बघ जरा तरी
पायरीचा मी दगड
तुझा भाऊ गरीब जरी

मी उंच कळस
चढणार आकाशी
पायरीचा तू दगड
पडणार तळाशी

अरे,अरे कळसा
नको गाल फुगवून बसू
पायरीचा मी दगड
तरी भाऊ भाऊ असू

डौलदार मी कळस
माझा मुकुट कसा छान
पायरीचा तू दगड
तुझा पैजारांचा मान

अरे,अरे कळसा
नको झिडकारू मला
भाऊ ना मी तुझा
माझा दादा तू भला

कुठे मी कळस
मला ठेंगणे आभाळ
पायरीचा तू दगड
आपली पायरी सांभाळ

कळसाचा दगड
गर्वाने चढला
पायरीचा दगड
मान घालून बसला

इतक्यात आला सज्जन
देवदर्शन करीत
पायरीवर बसला
‘राम राम’ करीत

तितक्यात आला कावळा
पंख फडकावीत
जाऊन बसला कळसावर
‘काव काव’ करीत

- रा. अ. काळेले (रामचंद्र अनंत काळेले)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची