Loading ...
/* Dont copy */

पीक खुशीत डोलतंया - मराठी कविता (उत्तम कोळगावकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी उत्तम कोळगावकर यांची पीक खुशीत डोलतंया ही लोकप्रिय मराठी कविता.

पीक खुशीत डोलतंया - मराठी कविता (उत्तम कोळगावकर)

पीक खुशीत डोलतंया भारी, भरला आनंद समद्या शिवारी


पीक खुशीत डोलतंया - मराठी कविता (उत्तम कोळगावकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी उत्तम कोळगावकर यांची पीक खुशीत डोलतंया ही लोकप्रिय मराठी कविता.



पीक खुशीत डोलतंया भारी
भरला आनंद समद्या शिवारी
बनून पाचूचं रान
आमचं हरलं देहभान

आज रानाची शोभा न्यारी
आल्या सरसर भुईवर धारा
ताप मातीचा सरला सारा
समदं शिवार फुलून आलं
बगून मन हे भुलून गेलं

गेल्या भुलून दिशाही चारी
दाट पिकांनी सजली शेतं
पीक मजेत गिरकी घेतं
गार वारं हे झुळझुळ व्हातं
पानापानांत गाणी गातं

गाती पानात पाकरंही सारी
काळ्या आईची कराया पूजा
राबराबला शेतकरी राजा
ऊनातानात घाम त्यानं शिपला
मळा मोत्यांचा मातीत पिकला

आली सोन्याची दौलत दारी

- उत्तम कोळगावकर

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची