Loading ...

लढव लढव गड - मराठी कविता (उत्तम कोळगावकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी उत्तम कोळगावकर यांची लढव लढव गड ही लोकप्रिय मराठी कविता [Marathi Kavita].

लढव लढव गड - मराठी कविता (उत्तम कोळगावकर)

तुडव घाट हा परिस्थितीचा, लढव लढव गड आयुष्याचा


लढव लढव गड - मराठी कविता (उत्तम कोळगावकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी उत्तम कोळगावकर यांची लढव लढव गड ही लोकप्रिय मराठी कविता.



तुडव घाट हा परिस्थितीचा
लढव लढव गड आयुष्याचा

जिकडे तिकडे तुटल्या वाटा
वादळवारे विराट लाटा
रस्ता जरी हा काळोखाचा
लढव लढव गड आयुष्याचा

वाटा वळणे समजुन घे तू
सूर मनाशी जुळवून घे तू
विचार केवळ कर विजयाचा
लढव लढव गड आयुष्याचा

बेत मनाशी आखत राही
पाऊल भक्कम टाकत जाई
मार्ग धरुनी निर्धाराचा
लढव लढव गड आयुष्याचा

असेल खडतर चढण कितीही
धरुन येईल मनी भितीही
बाळग बाणा झुंजाराचा
लढव लढव गड आयुष्याचा

नको थांबवू तुझी चढाई
अखंड ठेवी सुरू लढाई
झडेल डंका तुझ्या यशाचा
लढव लढव गड आयुष्याचा


उत्तम कोळगावकर यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


- उत्तम कोळगावकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची