Loading ...

लेझीम चाले जोरात - मराठी कविता (श्री. बा. रानडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी श्री. बा. रानडे (श्रीधर बाळकृष्ण रानडे) यांची लेझीम चाले जोरात ही लोकप्रिय मराठी कविता.

लेझीम चाले जोरात - मराठी कविता (श्री. बा. रानडे)

दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा, बैल माजले


लेझीम चाले जोरात - मराठी कविता (श्री. बा. रानडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी श्री. बा. रानडे (श्रीधर बाळकृष्ण रानडे) यांची लेझीम चाले जोरात ही लोकप्रिय मराठी कविता.



दिवस सुगीचे सुरु जाहले
ओला चारा, बैल माजले
शेतकरी-मन प्रफुल्ल झाले
झुन झिन, लेझीम चाले जोरात

चौघांनी वर पाय ऊचलले
सिंहासनी त्या ऊभे राहिले
शाहिर दोघे ते डफवाले
ट्प ढुम, ढुम ढुम
डफ तो बोले, लेझीम चाले जोरात

दिवटी फुरफुर करु लागली
पटक्यांची वर टोके डूलली
रांग खेळण्या सज्ज जाहली
छन खळ, ढुम ढुम
छन छन, पट ढुम, लेझीम चाले जोरात

भरभर डफ तो बोले घुमुनी
लेझिम चाले मंडल धरुनी
बाजुस, मागे, पुढे वाकुनी
खळ खळ, छन छन
झण छन, खळ झन, लेझीम चाले जोरात

डफ तो बोले-लेझीम चाले
वेळाचे त्या भान न ऊरले
नादभराने धुंध नाचले
छन छन, ढुम ढुम
खळ छन, ढुम ढुम, लेझीम गुंगे नादात

सिंहासन ते डुलू लागले
शाहिर वरती नाचु लागले
गरगर फिरले लेझीमवाले
छन छन, खळ खळ
झण झण, छन छन, लेझीम चाले नादात

दिनभर शेती श्रमुनी खपले
रात्रीसाठी लेझीम चाले
गवई नलगे, सतारवाले
छन छन, खळ खळ
झण झण, छन झन, रात्र संपली नादात

पहाट झाली - तारा थकल्या
मावळतीला चंद्र उतरला
परी न थकला लेझीम - मेळा
ढूम झन
खळ खळ, लेझीम खाली

“चला जाऊया शेतात”

- श्री. बा. रानडे (श्रीधर बाळकृष्ण रानडे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची