Loading ...

ऑटोग्राफ सिनेमा थिएटर आणि ओटीटी आधी टेलिव्हिजनवर

बहुचर्चित ऑटोग्राफ हा मराठी सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या आधी पाहा महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर.

ऑटोग्राफ सिनेमा थिएटर आणि ओटीटी आधी टेलिव्हिजनवर

ऑटोग्राफ सिनेमाच्या निमित्ताने टेलिव्हिजनच्या इतिहासात घडणार नवा प्रयोग!


ऑटोग्राफ सिनेमा थिएटर आणि ओटीटी आधी टेलिव्हिजनवर

बहुचर्चित ऑटोग्राफ सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या आधी पाहा महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर.



प्रेमापेक्षा नातं महत्वाचं... कारण प्रेम एकवेळ संपेल पण नातं... ते कायमच असतं.... अशीच एक जपून ठेवावी अशी लव्हस्टोरी म्हणजे ऑटोग्राफ सिनेमा. एका व्यक्तीच्या खऱ्या प्रेमाच्या शोधाची आणि त्याच्या या प्रवासात त्याला भेटलेल्या माणसांची ही कथा आहे. सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शन, अंकुश चौधरी, अमृता खानविलकर, उर्मिला कानेटकर, मानसी मोघे अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आलीय.

ऑटोग्राफ सिनेमाचे पोस्टर
ऑटोग्राफ सिनेमाचे पोस्टर

सर्वात महत्त्तवाची गोष्ट म्हणजे हा मचअवेटेड सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या अगोदर स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल. रविवार १४ मे ला दुपारी १ वाजता घरबसल्या प्रेक्षकांना या अनोख्या लव्हस्टोरीचा आनंद घेता येईल. टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदा नवाकोरा सिनेमा थिएटर आणि ओटीटीच्या आधी स्टार प्रवाहवर प्रदर्शित होत आहे.

ऑटोग्राफ सिनेमाचे दिग्दर्शक आणि स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे या सिनेमाविषयी सांगताना म्हणाले, ‘लव्हस्टोरी करायला एक वेगळीच मजा असते. प्रत्येक लव्हस्टोरी आपल्याला कुठेतरी आपलीच आहे असं भासवते आणि म्हणूनच ती प्रत्येकाच्या मनाला भिडते. ऑटोग्राफ सुद्धा अशीच एक लव्हस्टोरी आहे . जगातला प्रत्येक माणूस या अश्या प्रवासातून गेलाय पण याचा शेवट मात्र अनुभवण्यासारखा आहे.

दिग्दर्शक म्हणून मला तो फार आवडलाय आणि मला खात्री आहे रसिकांना सुद्धा तो नक्की आवडेल. महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर हा सिनेमा प्रदर्शित होतोय याचा अतिशय आनंद होतोय.’

तेव्हा पाहायला विसरु नका ऑटोग्राफ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार १४ मे ला दुपारी १ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


ऑटोग्राफ मराठी चित्रपटाचा टिझर (व्हिडिओ)




ऑटोग्राफ सिनेमा संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची