Loading ...
/* Dont copy */

मी शब्द तू गीत व्हावे (मराठी कविता)

मी शब्द तू गीत व्हावे (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री अर्चना डुबल यांची मी शब्द तू गीत व्हावे ही कविता.

मी शब्द तू गीत व्हावे (मराठी कविता)

मी शब्द तू गीत व्हावे, तू आणि मी एक व्हावे


मी शब्द तू गीत व्हावे (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री अर्चना डुबल यांची मी शब्द तू गीत व्हावे ही कविता.



मी शब्द तू गीत व्हावे
तू आणि मी एक व्हावे
वाहून जावे तुझ्या मिठीत
मी तुझ्यासवे हे गीत गावे...

अव्यक्त भावनांना माझ्या
शब्द रुपात तू उतरावे
लपलेल्या चांदण्यानी
अधीर होऊन क्षणात मोहरावे...

रोज नव्याने यावा
प्रीतीला आपल्या बहर
आर्त मनातील त्या भावनेला
येऊदे प्रेमाची लहर...

सूर बनून छेडावी तू तार
बहरावे ते प्रेमाचे क्षण
सुखाच्या लहरीत होतील
एकरूप दोन्ही अधीर मन...

दोघांच्या श्वासात असलेले
संपेल आता ते अंतर
प्रेम गीत असेच सुरू
राहील आयुष्यभर निरंतर...


मी शब्द तू गीत व्हावे संबंधी महत्त्वाचे दुवे:


- अर्चना डुबल

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची