Loading ...

महानतेचा मानदंड तू - मराठी कविता (पद्मा गोळे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी पद्मा गोळे (पद्मावती विष्णू गोळे) यांची महानतेचा मानदंड तू ही लोकप्रिय मराठी कविता.

महानतेचा मानदंड तू - मराठी कविता (पद्मा गोळे)

भयाण अंधाराने होते जीव कोंदुनि गेले


महानतेचा मानदंड तू - मराठी कविता (पद्मा गोळे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी पद्मा गोळे (पद्मावती विष्णू गोळे) यांची महानतेचा मानदंड तू ही लोकप्रिय मराठी कविता.



भयाण अंधाराने होते जीव कोंदुनि गेले
जोखड वाहत मानेवरती जगणे नशिबी आले

तुकड्यांसाठी मान विकुनिया केली भिक्षांदेही
निजधर्माची वा देशाची चाडच उरली नाही

पालखीतुनी मिरवत होते ते विकले गेलेले
स्वाभिमान अन्‌ क्षात्रतेज तर धुळीत मिळुनी गेले

या अंधारी दिशादिशांवर प्रकाश फेकीत येसी
महानतेचा मानदंड तू, महाराष्ट्री अवतरसी

स्पर्श तुझ्या पायांचा हो अन्‌ पेटुनि उठली माती
पायतळीचे दगडहि उठले मिळवित प्राणज्योती

नजर तुझी संजीवक पडता वठल्या झाडावरती
समशेरींसह लाख मावळे वीर प्रगटले भवती

झोपड्यांतुनी उभे ठाकले सशस्त्र गड अन्‌ किल्ले
तोफांनाही अजिंक्य ठरले केवळ बरच्या, भाले

पराभूत ही भूमी उठली शस्त्रास्त्रे परजुनिया
महाराष्ट्राला महानतेप्रत नेसी तू शिवराया

- पद्मा गोळे (पद्मावती विष्णू गोळे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची