Loading ...

भय इथले संपत नाही - मराठी कविता (कवी ग्रेस)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी कवी ग्रेस (माणिक सीताराम गोडघाटे) यांची भय इथले संपत नाही ही लोकप्रिय मराठी कविता.

भय इथले संपत नाही - मराठी कविता (कवी ग्रेस)

भय इथले संपत नाही, झाडांची हलती पाने


भय इथले संपत नाही - मराठी कविता (कवी ग्रेस)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी कवी ग्रेस (माणिक सीताराम गोडघाटे) यांची भय इथले संपत नाही ही लोकप्रिय मराठी कविता.



भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते

हे झरे चंद्रसजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडात पुन्हा उगवाया

त्या वेली नाजूक भोळ्या, वार्‍याला हसवून पळती
क्षितिजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती

तो बोल मंद हळवासा, आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू अंगी राघव शेला

देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळांपाशी, मी उरलासुरला थेंब

संध्येतील कमळासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे

ते धुके अवेळी होते, की परतायाची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई

- कवी ग्रेस (माणिक सीताराम गोडघाटे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची