Loading ...
/* Dont copy */

आमचं नालंदा - मराठी कविता (फ. मुं. शिंदे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी फ. मुं. शिंदे (फकीरराव मुंजाजीराव शिंदे) यांची आमचं नालंदा ही लोकप्रिय मराठी कविता.

आमचं नालंदा - मराठी कविता (फ. मुं. शिंदे)

विसरसीमेहून आठवत आठवत येत आहे


आमचं नालंदा - मराठी कविता (फ. मुं. शिंदे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी फ. मुं. शिंदे (फकीरराव मुंजाजीराव शिंदे) यांची आमचं नालंदा ही लोकप्रिय मराठी कविता.



विसरसीमेहून आठवत आठवत येत आहे
मास्तर, तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे?

अस्ताभोवती माझं पालवताना मन तुमच्या
मास्तर, उभ्याच आहेत रेघा भागाकाराच्या वेशीच्या

तुम्ही एक अधिक एक शिकवलं
मास्तर, मला तुमच्यात मिळवलं
येता जाता ठेच लागायची
मास्तर, होता तुम्ही वेशीबाहेर
आमचं नालंदा तुमचं घर

हाडांनी सांधलेली तुम्ही एक आकृती होता
माणूस होता, नागरिक होता, स्वच्छ स्वच्छ नीती होता
तुमच्या स्पर्शातून उगवत होती माझी कोवळी फांदी
अजूनही नाही कळत मास्तर, तुम्ही अस्पृश्य कसे होता?

होताहेत आता मुक्त संवाद आकाश-मातीचे
पण नालंदा कुठं आहे?
मास्तर, तुम्ही जोडलेलं वर्तुळ कुठं आहे?

- फ. मुं. शिंदे (फकीरराव मुंजाजीराव शिंदे)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची