Loading ...
/* Dont copy */

तुझ्या सोबतीचे सात जन्म (मराठी कविता)

तुझ्या सोबतीचे सात जन्म (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अमृता शेठ यांची तुझ्या सोबतीचे सात जन्म ही कविता.

तुझ्या सोबतीचे सात जन्म (मराठी कविता)

ज्या नात्यात, प्रेम अगदी भरभरून आहे तिथे भांडण कसं बरं टिकणार


तुझ्या सोबतीचे सात जन्म (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अमृता शेठ यांची कविता ‘तुझ्या सोबतीचे सात जन्म’.



ज्या नात्यात,
प्रेम अगदी भरभरून आहे तिथे भांडण कसं बरं टिकणार
विश्वास अगदी भरभरून आहे तिथे शंका बरं कशा उरणार
आणि म्हणुनच तुझ्या सोबतीचे सात जन्मही नाही पुरणार

ज्या नात्यात,
काळजीचा पूर आणि मदतीचा सूर आहे तिथे सुरेल गाणच गुंजणार
मी जेवणात कितीही प्रयोग केले तरी तू ते गोड मानून खाणार
आणि म्हणुनच तुझ्या सोबतीचे सात जन्मही नाही पुरणार

ज्या नात्यात,
एक चांचल, बडबडी तिथे दुसरा शांत समजूतदार मग खूप मजा तर असणार
कितीही मोठे झालो तरी तुझ्या खोड्या मात्र मी काढणार
आणि म्हणुनच तुझ्या सोबतीचे सात जन्मही नाही पुरणार

ज्या नात्यात,
कधी जिंकणार तर कधी हरणार पण तरी पुन्हा नव्याने उभारणार
जिला तु नवरा म्हणुन मिळाला तिचं सुख असंच फुलणार
आणि म्हणुनच तुझ्या सोबतीचे सात जन्मही नाही पुरणार

- अमृता शेठ

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची