Loading ...
/* Dont copy */

फार फरक पडतो - मराठी कविता (राजेश पोफारे)

फार फरक पडतो (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी राजेश पोफारे यांची फार फरक पडतो ही कविता.

फार फरक पडतो - मराठी कविता (राजेश पोफारे)

सगळे ऋतू एक करून, सगळी तयारी केली असते... फार फरक पडतो

फार फरक पडतो

राजेश पोफारे (सेंदरी / देवळी, वर्धा. महाराष्ट्र, भारत)

फार फरक पडतो आयुष्यात कुणी नसल्याने अचानक आयुष्यात कुणी घुसल्याने फार फरक पडतो कधीतरी चुकून प्रेमात पडल्याने एकाच वेळी दोघींचाही कॉल आल्याने फार फरक पडतो समुद्रासारखा खारेपणा माझ्यात होता तरीही त्या गोड नदीने मला मिठी मारल्याने फार फरक पडतो कधी महबूब होतो रे तिचा मी वर्षभरात मामा झाल्याने फार फरक पडतो आणि शेवटी तिला एवढच बोललो की (प्रेमाच सोड ना आपण पुन्हा मैत्रीच करू अडकलेल्या या जिवाला जरा मोकळे करू त्या अर्धवट फरवरी ला विसरून जा तू आपण मैत्रीचे अधिक महिने साजरे करू) समुद्रमंथनातून मिळालेल्या अमृतासारखा वाटायचा तो चहा जेव्हा मित्रांसोबत एकात दोन करून प्यायचो पण हल्ली no sharing no caring no comparing हे ही चहात आल्याने फार फरक पडतो सगळे ऋतू एक करून, सगळी तयारी केली असते वावर, घरदार सगळ सोडून, मुख्य परीक्षा ही दिली असते मी टॉप ला आहे हे दाखवणारी लिस्ट ही लागली असते मग फक्त तो एक कॉल न आल्याने फार फरक पडतो हाफ पॅन्ट घालून शाळेत जायच्या वयात जर बापाला गमावलं तर पुढे काय होते हे त्याने कधी जाणवूच दिल नाही ‘दादा’ तू ग्रेट आहे रे, पण एक सांगू बाप नसल्याने फार फरक पडतो पाहिल्यासारखं कुणी कुणाला विश करत नाही त्यांच्या Instagram, Facebook, WhatsApp ला तुमचं स्टेटस ही लावत नाही कारण त्याच्या सोबत तुमचा एक जॉईन फोटो नसल्याने फार फरक पडतो लग्नाचा जोडीदार चुकल्याने आणि लिहायचे खूप असते पण विषय न सुचल्याने फार फरक पडतो

इतर मराठी कविता वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची