Loading ...
/* Dont copy */

जीवनमर्म - मराठी कविता

जीवनमर्म (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री सविता कुंजिर यांची जीवनमर्म ही कविता.

जीवनमर्म (मराठी कविता)

या देहाच्या पाचोळ्याला जकडून, मनाच्या मनमर्जीला वाहून घेऊन


जीवनमर्म (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री सविता कुंजिर यांची जीवनमर्म ही कविता.



या देहाच्या पाचोळ्याला जकडून
मनाच्या मनमर्जीला वाहून घेऊन
कुठे! चाललाय हा... जीवाचा प्रपंच...

वाऱ्याच्या वरातीवर हेलकावणारं जीवन
कापरा परी फुर्रर्र उडून जाणारे क्षण
अन्‌ पंख छाटलेल्या स्वनांचे... छिन्नविछिन्न तुकडे...

‘मी मी’ पायी विटवलेला हा देह
जे नाही त्याच्या पायी फोडलेला टाहो
अन्‌ हाताचं सोडून पळत्याच्या पाठी... लागलेला हा देह...

ललाटीच्या रेषांना देऊन दूषण
कष्ट करून झिझवलं... निष्ठुर तन
अन्‌ आता मिरवतोय भूषण, अस्थिपंजर देहाचं

माझं तुझं करता, वाया गेलेले श्वास
कैक! न ओसंडलेल्या हुंदक्यांची रास
स्मशानाच्या रांगेत उभे राहून मोजतोय... पाप पुण्याचं माप...

अश्रूंच्या! राशींची मांडून आरास
अन्‌ दुःखाच्या रात्रींची करून राख
जगण्याचा किल्ला लढवलाय... असं समजवते स्वतःला...

- सविता कुंजिर

अभिप्राय

जागतिक महिला दिन (८ मार्च)
जागतिक महिला दिन (८ मार्च)
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची