Loading ...

चहाचे चाहते (अनुभव कथन)

चहाचे चाहते (अनुभव कथन) - १५ डिसेंबर जगातील सर्व देशात जागतिक चहा दिन उत्साहाने साजरा केला जातो, रामकृष्ण जोशी यांचे अनुभव कथन.

चहाचे चाहते (अनुभव कथन)

१५ डिसेंबर जगातील सर्व देशातील जागतिक चहा दिन


चहाचे चाहते

१५ डिसेंबर जगातील सर्व देशात जागतिक चहा दिन उत्साहाने साजरा केला जातो. चहाचे चाहते रामकृष्ण जोशी यांचे अनुभव कथन



तसं तर भारतात इंग्रज राजवटीसोबत चहा या पेयाने प्रवेश केला. प्रथम श्रीमंतांच्या घरचा चैन असलेला चहा बघताबघता सर्वसामान्य माणसाचा दैनंदिन गरजेचा कधी झाला हे कळलेच नाही.

नुसत्या नावाच्या उच्चाराने आपल्याला तरतरीत करणारे पेय म्हणजे चहा होय. जगभरातील अनेकांची सकाळ चहाच्या वाफाळत्या कपाशिवाय अशक्य आहे. चहाशिवाय सकाळ म्हणजे उदास उदास किंवा सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अशी ही बिकट अवस्था.

मित्रांनो व भगिनींनो मी दहावीपर्यंत चहाची चव बघितली नव्हती. शाळेय शिक्षण पूर्ण झाल्यावर मी चहा प्यायला सुरुवात केली. चहा असा पेय प्रकार की जो तुम्ही कुठेही गेलात तरी तो तुमच्या स्वागताला हजर असतो.

सुखाच्या प्रसंगाची रंगत वाढवणारा, दुःखाच्या प्रसंगी काळजी घेणारा, आळसाला चुटकीसरशी दूर पळवून लावणारा चहा हा प्यायलाच हवा. आपल्या परभणी शहरात चहाप्रेमी व्यक्तीसाठी खालील उपहारगृहात चहा उत्कृष्ट चवीचा उत्तम मिळतो.

  • श्री पांडुरंग कृपा हॉटेल (विसावा कॉर्नर, परभणी)
  • कृष्णा उडपी (विसावा कॉर्नर परभणी)
  • दिपक टी सेंटर / खास अद्रकचा (लक्ष्मीनारायण मंदिर समोर)
  • अप्पा पेढेवाले उपहारगृह (गांधी पार्क)
  • अपना कार्नर येथील सर्व उपहारगृह

काही मंडळी मधुमेह झाल्यामुळे तब्येतीच्या काळजीने साखरेशिवाय चहा घेतात. तर काहीजणाना गोडमिट्ट चहा लागतो. आपल्या येथे घरात अथवा दुकानात मंडळी चहा घेत असतील त्यावेळी आगंतुक कोणी आला तर त्याला चहाचा आग्रह केला जातो.

मी मागच्या महिन्यात दिवाळीनिमित्त रेल्वेने औरंगाबादला जात होतो त्यावेळेस प्रवासाचा प्रचंड शीण आला व चहाची तल्लफ आली. परतूर रेल्वे स्थानकावर गरमागरम वाफाळलेला चहा घेतला व प्रवासाचा सर्व शीण गेला.

भारतात तर चहा हा गरीब घरापर्यंत पोहचला. कॉफी मात्र श्रीमंतांच्या घरातच राहिली. ‘कॉफी हाऊस’ प्रमाणे आता शहरात ‘चहा हाऊस’ उघडत आहेत. इराणी हॉटेलच्या टपरीपासून सुरू झालेला चहाचा प्रवास आज चहा हाऊस पर्यत आला आहे.

मागील दोन वर्षांपासून चहाप्रेमीसाठी महानगरातील नावाजलेल्या चहाची स्टॉल्स परभणीत सुरू झाली होती. त्यात खालील प्रतिष्ठाने सुरू झाली ती -

  • अमृततुल्य येवले चहा
  • झक्कास चहा
  • नंबर १
  • साईबा चहा

मित्रांसोबत गप्पांची मैफिल जमावी व अमृततुल्य चहाचा कप हातात यावा मग तो चहा घेताना ब्रम्हानंद मिळतो तो शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. असाच योग दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आला होता. मी, संदीप, गणेश आम्ही वर्गमित्र अ‍ॅड. नागेश उबाळे याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी, संदीप, गणेश गेलो होतो त्यावेळी येवलेचा अमृततुल्य चहाचे प्रतिष्ठान नविनच परभणीत सुरू झाले होते मग काय; मित्र, अमृततुल्य चहा आणि गप्पांची मैफिल खूप छान योग आला होता.

भारतातील चहाचे चाहते पाहून हिंदी चित्रपटसृष्टीलाही इसवी सन १९८३ मध्ये चहाने भुरळ घातली होती.

सौतन या हिंदी चित्रपटातील -
शायद मेरी शादी का खयाल दिल में आया है
इसीलिए मम्मी ने मेरी, तुम्हें चाय पे बुलाया है....

हे गीत दिग्दर्शकाने खूबीने खास चित्रीकरणासह चित्रपटात सादर केले होते.

चहाचे चाहते असणाऱ्या सर्व चहाप्रेमींना १५ डिसेंबर जागतिक चहा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

- रामकृष्ण जोशी

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची