Loading ...

मुलाचं माहेरपण - मराठी कविता (रंजना बाजी)

मुलाचं माहेरपण (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री रंजना बाजी यांची मुलाचं माहेरपण ही कविता.

मुलाचं माहेरपण - मराठी कविता (रंजना बाजी)

लग्न होऊन वेगळं राहणाऱ्या मुलाचा फोन मी येणार आहे घरी... मुलाचं माहेरपण

मुलाचं माहेरपण

रंजना बाजी (महाराष्ट्र, भारत)

बहुतेक सर्वच तत्सम सुशिक्षित घरांमधली दाहक वास्तविकता दाखविणारी कवयित्री रंजना बाजी यांची एक हळव्या विषयाची मुलाचं माहेरपण ही कविता.

लग्न होऊन वेगळं राहणाऱ्या मुलाचा फोन मी येणार आहे घरी, दोन चार दिवस काम आहे तिकडं जरा आईबाबाच्या आनंदाला उधाणच दोघांच्या एकटेपणाला नवी पालवी बरेच दिवस लक्ष न दिलेला बेड आता झटकून त्यावर त्याला आवडणारं सुती मऊ बेडशीट त्याच्या आवडत्या चादरी एकमेकांना जोडून लहानपणी लागायचं तसं पांघरूण ऊबदार तो गेल्यावर यांनी तिथं केलेला पसारा पुन्हा बाहेर त्याची खोली पुन्हा त्याचीच सगळं पूर्वीसारखंच त्याच्या आवडीचं सवयीचं बाबाचं बाहेरून बटर, चीज आणणं पूर्वी ज्याची मनाई त्याच गोष्टी प्रेमानं फ्रिजमध्ये हजर मनाची समजूत कधीतरीच येतो असू दे मुलगा येतो घरात बनतात आता पदार्थ, फक्त त्याच्या आवडीचेच दोघं सांगत राहतात तो नसतानाच्या बारीकसारीक गोष्टी त्याला तपशीलवार उगीचच त्याच्याभोवती फिरणं दोघांचं त्याचा सहवास, त्याचं असणं भरून घेणं घरात, मनात मुलगाही आनंदात पुन्हा लहान आईबाबाचा लाडका हट्ट पुरवून घेणारा त्यानंही तात्पुरत्या मागं टाकल्यात स्वतःच्या घराच्या जबाबदाऱ्या, कामं मजेत लोळत कसल्याही वेळा न पाळता काहीच काम न करता अनुभवतोय तोही माहेरपणच आत्ता तर आलाय म्हणेम्हणेपर्यंत त्याचा परतायचा दिवस आईचा हात रेंगाळत राहतो त्याच्या खांद्यावर, डोक्यावर बाबा विचारत राहतो उगाचच काहीबाही प्रश्न कातर आवाजात आई सोबत बांधून देते गोष्टी काही त्याच्या आवडीच्या काही सुनेच्या सूनही सामील आता त्यांच्या मायेच्या परिघामध्ये मुलाची पावलं जड जायचं परत स्वतःच्या संसारात पुन्हा मोठं व्हायचं अडकायचं त्याच चक्रात मुलगा त्याचे काही कपडे सोडून जातो इथंच पुन्हा आल्यावर लागतीलच आईचा हात फिरत राहतो मुलाच्या कपड्यांवर बराच वेळ जणू साठवत असते मनात ती त्याचं इथं असणं पिल्लू मोठं होऊन घराबाहेर उडणारच ही अपरिहार्यता समजून घेणं, मुरवून घेणं अवघडच पण अटळ

रंजना बाजी यांचे इतर लेखन वाचा:

अक्षरमंच - मुक्त विचारपीठ

मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची