Loading ...

ही लिफ्ट अशीच - मराठी कविता

ही लिफ्ट अशीच (मराठी कविता) - ही लिफ्ट अशीच खाली जात राहीली आणि तळ गाठुन ही नाही थांबली; जितेष दळवी यांची कविता.

ही लिफ्ट अशीच (मराठी कविता)

आता लक्ष दे मध्य आला आहे. लिफ्ट इथवरच आहे


ही लिफ्ट अशीच (मराठी कविता)

ही लिफ्ट अशीच खाली जात राहीली आणि तळ गाठुन ही नाही थांबली; जितेष दळवी यांची कविता.



ही लिफ्ट
अशीच खाली
जात राहीली
आणि
तळ गाठुन ही
नाही थांबली;
किंवा
थांबवलीही नाही
आपण दोघांनीही,
आणि
इमर्जन्सी बटन
दाबुन,
मदतही नाही
मागीतली,
नाकर्त्यांची

तर पोहोचु आपण
खोल
जिथे
गुरुत्वाकर्षण
शुन्य होत जाईल,
आनि तरंगु
आपण फक्त
आणि
फक्त
तुझ्या माझ्या
एकमेकांच्या
विश्वासावर

शोधु शकेल
जिथे
माझ्यातला मी
आणि तुलाही
गवसेल तुझ्यातली तु,
भेटु शकु
एकमेकांना
जिथे
कोणतेच वजन
खाली ओढु
शकणार नाही
आपल्याला

आता
लक्ष दे
मध्य आला आहे.
लिफ्ट
इथवरच आहे,
परत वळणं
भाग आहे

वाट्टेल तितके
मावेल तितके
शुन्य गुरुत्वाकर्षण
भरुन घेऊया
खिशात

कारण आता
हळूहळू वाढत
जातील
पायांना
खेचनारी जळमटं,
आणि
नको तितका
एकमेकांचा आकस

लिफ्ट उघडली आहे,
या सखल पृष्ठभागावर
जमिनीवर

इथे थारा नाही
शुन्यांना
म्हणुन
ते खिशातील
शुन्य गुरुत्वाकर्षण
असु दे
जमिनीवरुन
सोबत
उडायला

- जितेश दळवी

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची