Loading ...
/* Dont copy */

बाप्पाच्या मनातलं - मराठी कविता

बाप्पाच्या मनातलं, मराठी कविता - [Bappachya Manatle, Marathi Kavita] माझ्या आगमनाची तयारी पाहून मनात आनंद झाला, गोकुळ कुंभार यांची कविता.

बाप्पाच्या मनातलं - मराठी कविता | Bappachya Manatle - Marathi Kavita

माझ्या आगमनाची तयारी पाहून मनात आनंद झाला


बाप्पाच्या मनातलं (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गोकुळ कुंभार यांची भक्ती कविता ‘बाप्पाच्या मनातलं’.



माझ्या आगमनाची तयारी पाहून मनात आनंद झाला
प्लास्टिकच्या पिशवीत येताना माझा श्वास जरा गुदमरला
जंगी स्वागतात घरी पोहचलो
सुवास न येणाऱ्या फुलांची सजावट पाहून मीही हरखून गेलो

ऐवढ्या मोठ्या घरात आरतीला माणसे मात्र दोन तीन
आपण शहरातल्या घरी आलोय नंतर माझ्या लक्षात आला सीन
टिव्हीवरच्या बातम्या बघत १च मोदक खाल्ला
भेसळीची बातमी पाहून मी मोदकाचा विचारच सोडून दिला

१० दिवसानंतर निरोपाची वेळ आली
मला ही न कळणाऱ्या गाण्यावर पोर बेधुंद होऊन थिरकली
रस्त्यावरच्या खड्डयावरुन जाताना माझी मान मात्र लचकली

शेवटची आरती झाली
५०१ रू. दक्षिणा म्हणून ठेवली
आजुबाजूला ED ची माणसे पाहिली
तेव्हा त्याच्यावर नजर गेली
यावर्षी एवढ कळलं
पुढच्या वेळी येताना सरळ गावाकडचा रस्ता धरायचा
तरी बापूजी म्हणतच होते देवा तुम्ही खेड्याकड चला

- गोकुळ कुंभार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची