Loading ...
/* Dont copy */

अमरावती जिल्हा (महाराष्ट्र)

अमरावती जिल्हा - [Detailed Information and Photos of Amravati District] अमरावती जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.

अमरावती जिल्हा | Amravati District

भगवान श्रीकृष्णांना ‘अमर’ या नावाने ओळखले जाते. त्यावरून शहरास ‘अमरावती’ नाव पडले असावे


अमरावती जिल्हा

पौराणिक कथा व दंतकथांनुसार अमरावती जिल्ह्याचा संबंध श्रीकृष्ण, रुक्मिणी व पांडवांशी जोडला जातो.

पौराणिक कथा व दंतकथांनुसार अमरावती जिल्ह्याचा संबंध श्रीकृष्ण, रुक्मिणी व पांडवांशी जोडला जातो. रुक्मिणी ही येथील कुंडिनपुरची म्हणजे सध्याच्या कौडिणपूरची राजकन्या. साहजिकच, या जिल्ह्याचा संबंध कृष्णाशीही जोडला जातो.हा

हा परिसर महाभारतात प्रसिद्ध असलेल्या विराट राजाच्या अमलाखाली होता, असे मानले जाते. अज्ञातवासाच्या काळात पांडवाचे वास्तव्य सध्याच्या चिखलदऱ्याच्या घनदाट जंगलात होते, असे म्हटले जाते. येथील घनदाट जंगले राहिल्यास विजनवासास हा परिसर सुयोग्य होता, याची साक्ष पटते.

विराटाच्या पदरी दासी म्हणून राहत असलेल्या सैरंध्रीचा (द्रौपदीचा) मानभंग केला म्हणून चिडून जाऊन विराटाच्याच पदरी असलेल्या बल्लवाने (भीमाने) विराटचा मेव्हणा किचक याचा वध केल्यानंतर त्याचा देह येथील दरीत फेकून दिला.

त्यामुळे या परिसरात ‘किचकदरा’ म्हणून ओळखले जाऊ लागले. कालांतराने या किचकदऱ्याचा अपभ्रंश ‘चिखलदरा’ असा झाला अशी आख्यायिका आहे. किचकाचा वध केल्यानंतर भीमाने आपले रक्तरंजित हात जवळच असलेल्या कुंडात धुतले म्हणून या कुंडास ‘भीमकुंड’ म्हणतात, अशीही एक आख्यायिका जोडली जाते.

वरील प्रकारे दंतकथांनी महाभारताशी जोडल्या गेलेल्या या जिल्ह्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, लो. टिळकांचे जवळचे सहकारी दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी, शिक्षणमहर्षी व पुरोगामी विचारवंत डॉ. पंजाबराव देशमुख अशा थोर पुरुषांची देणगी महाराष्ट्राला दिली आहे.

मुख्य ठिकाण: अमरावती
तालुके: तेरा
क्षेत्रफळ: १२,२१० चौ. कि. मी.
लोकसंख्या: २२,००,०५७


अमरावती जिल्ह्याचा इतिहास


अमरावती शहर हे अमरावती जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे. साहजिकच, शहराच्या नावावरून हा जिल्ह्याला अमरावती जिल्हा म्हणून ओळखला जातो. महाभारतात विदर्भ राज्याचा उल्लेख आहे. याविदर्भाची राजधानी अमरावती होय. भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी ही कुंडिनपूरच्या राजाची - भीष्मकाची कन्या असल्याचा उल्लेख सापडतो. हे कुंडिनपूर आता कौंडीण्यपुर म्हणून ओळखले जाते.

गावानजिकच्या अंबा मंदिरात रुक्मिणी पूजेसाठी आली असता श्रीकृष्णाने तिचे अपहरण केल्याची कथा सांगितली जाते. “नल-गे औषध मजला!” असे सांगणारी दमयंती ही विदर्भराजकन्यासुद्धा कुंडिनपूरचीच! भगवान श्रीकृष्णांना ‘अमर’ या नावाने ओळखले जाते. त्यावरून शहरास ‘अमरावती’ नाव पडले असावे, असे म्हटले जाते. वरीलप्रमाणे पौराणिक उल्लेख सापडत असले. तरीही या जिल्ह्याचा सुस्पष्ट असा प्राचीन इतिहास उपलब्ध नाही. मात्र, येथील बराचसा परिसर मौर्याच्या अमलाखाली असल्याची नोंद सापडले.

अमरावती जिल्ह्याचे भौगोलिक स्थान


महाराष्ट्र राज्यातील उत्तरेकडील जिल्हा. जिल्ह्याच्या पूर्वेस नागपूर व वर्धा हे जिल्हे असून दक्षिणेस यवतमाळ जिल्हा आहे. अकोला जिल्हा अमरावती जिल्ह्याच्या नैऋत्येस व पश्चिमेस पसरला आहे. मध्य प्रदेश राज्य अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस आहे. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळजवळ चार टक्के क्षेत्र या जिल्ह्याचे व्यापले आहे.

अमरावती जिल्ह्यातील तालुके

अमरावती जिल्ह्यात एकूण तेरा तालुके आहेत
 1. अमरावती
 2. नांदगाव-खंडेश्वर
 3. भातकुली
 4. अचलपूर
 5. चांदूर-बाजार
 6. मोर्शी
 7. वरूड
 8. चांदूर-रेल्वे
 9. तिवसा
 10. दर्यापूर
 11. अंजनगाव-सुर्जी
 12. चिखलदरा
 13. धारणी

अमरावती जिल्ह्याची प्राकृतिक रचना


मेळघाटचा डोंगराळ प्रदेश व पूर्णा नदीचा मैदानी प्रदेश अशी या जिल्ह्याची प्राकृतिक रचना आहे. धारणी व चिखलदरा या तालुक्याचा बहुतांश भाग मेळघाटच्या डोंगराळ प्रदेशात मोडतो. मेळघाटच्या डोंगररांगा हा वास्तविक सातपुडा पर्वताचाच भाग होय. यांना ‘गाविलगडचे डोंगर’ म्हणूनही ओळखले जाते.

अमरावती जिल्ह्याचा उर्वरित बहुतांश भाग पूर्वेच्या मैदानी प्रदेशात मोडतो. या मैदानी प्रदेशास ‘पयनघाट’ म्हणूनही ओळखले जाते. दक्षिणेस अमरावतीजवळ पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर आहेत.

अमरावती जिल्ह्यातील मृदा


अमरावती जिल्ह्याच्या मैदानी भागात काळी-कसदार ‘रेगूर’ मृदा आढळते. कापसाच्या पिकांसाठी ही मृदा उपजाऊ असल्याने तिला ‘कापसाची मृदा’ असेही म्हटले जाते. दर्यापूर व भातकुली या तालुक्यांमध्ये तसेच चांदूर-रेल्वे तालुक्याच्या पूर्व भागात ही मृदा आढळून येथे. या मृदेची पाणी टिकवून धरण्याची क्षमता अधिक असल्याने या मृदेत खरीप व रबी या दोन्ही हंगामात पिके घेतली जातात. सातपुड्याच्या डोंगराळ व पठारी भागात तांबडी मृदा आढळते.

अमरावती जिल्ह्यातील हवामान


अमरावती जिल्ह्यातील हवामान सर्वसाधारणपणे उष्ण, विषम व कोरडे आहे. उन्हाळा खूपच कडक व हिवाळा अतिशय थंड असतो. जिल्ह्यातील वार्षिक व दैनिक तापमान कक्षेत खुपच फरक आढळून येतो. जिल्ह्यातील उत्तर भाग उंच व डोंगराळ असल्याने तेथील हवा उन्हाळ्यातही थंड असते. ‘चिखलदरा’ हे थंड हवेचे ठिकाण याच परिसरात आहे.


अमरावती येथे पूर्वी उंबराची झाडे मोठ्या प्रमाणावर होती. उंबराच्या झाडास ‘औदुंबर’ असे म्हणतात. त्यावरून उदुंबरावती- उमरावती- अमरावती असा अपभ्रंश होत जाऊन आजचे अमरावती हे नाव रूढ झाले, अशीही ‘अमरावती’ नावाची एक उपपत्ती मांडली जाते.

अमरावती जिल्ह्यात पडणारा बहुतांश पाऊस जून ते सप्टेंबर या कालखंडात नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून पडतो. जिल्ह्यातील पावसाची सरासरी ८५ सें. मी. हून अधिक आहे. चिखलदरा व धारणी या उत्तरेकडील तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या अधिक आहे. डॉ. सी. एच. हनुमंतराव समितीच्या शिफारशींच्या आधारे केंद्र शासनाने १९९४-९५ पासून भातकुली, नांदगाव-खंडेश्वर, अचलपूर, चांदूर-बाजार, चांदूर-रेल्वे, तिवसा, दर्यापूर, धारणी व मोर्शी या तालुक्यांचा नव्याने अवर्षणप्रवण क्षेत्रात समावेश केला असून याच वर्षांपासून या तालुक्यांमध्ये अवर्षणप्रवण क्षेत्रविकास कार्यक्रम राबविला जात आहे.

अमरावती जिल्ह्यातील नद्या


पूर्णा, तापी व वर्धा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत. पूर्णेचा उगम मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगेत बेतुल जिल्ह्यात होतो. ही नदी जिल्ह्यात प्रथम उत्तर-दक्षिण वाहत जाऊन नंतर पश्चिमेकडे वळते.

तापी नदी जिल्ह्याच्या वायव्य सीमेवरून पश्चिमेकडे वाहात जाते. वर्धा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून दक्षिणेकडे वाहते.

चंद्रभागा, शहानूर व पेढी या पूर्वेच्या जिल्ह्यातील उपनद्या होत. अचलपूर हे तालुक्याचे ठिकाण चंद्रभागा नदीकाठी वसले आहे. तर अंजनगाव-सुर्जी हे तालुक्याचे ठिकाण शहानूर नदीकाठी वसले आहे.

कापरा, सिंपना व गाडगा या तापीच्या जिल्ह्यातील उपनद्या होत; तर चुडामण, माडू, चराघड, विदर्भा, बेंबळा व खोलाट या वर्धेच्या जिल्ह्यातील उपनद्या होत. चुडामण नदी वरूड तालुक्यातून वाहते. तर चराघड नदी मोर्शी तालुक्यातून वाहते. विदर्भा नदीचा बहुतांश प्रवाह तिवसा तालुक्यातून जातो. बेंबळा नदीचा बहुतांश प्रवास नांदगाव-खंडेश्वर तालुक्यातून होतो तर खोलाट नदी आपला अधिकांश प्रवास चांदूर-रेल्वे तालुक्यातून करते.

अमरावती जिल्ह्यातील धरणे


अमरावती जिल्ह्यात मोठे प्रकल्प फारसे नाहीत. मोर्शी तालुक्यातील वर्धा नदीवरील (उर्ध्व वर्धा) किंवा सीमोरा प्रकल्पाचे काम पूर्णतेच्या प्रगत अवस्थेत आहे.

अंजनगाव-सुर्जी तालुक्यातील शहानूर नदीवरील शहानूर प्रकल्प, अचलपूर तालुक्यातील हे जिल्ह्यातील नाव घेण्याजोगे अन्य प्रकल्प होत. आसेगाव-पूर्णा योजनेतून तसेच जवळच असलेल्या वडाळी व छत्री या तलावांमधून अमरावती शहराला पाणीपुरवठा जातो.

अमरावती जिल्ह्यातील पिके


अमरावती जिल्हा कृषिप्रधान असून लागवडीखालील क्षेत्रापैकी चाळीस टक्क्यांहून अधिक क्षेत्र अन्नधान्य पिकाखाली आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख अन्नधान्य पीक असून तिवसा, नांदगाव-खंडेश्वर, मोर्शी वरूड व चांदूर-रेल्वे हे तालुके ज्वारीच्या उत्पादनासाठी महत्त्वाचे आहेत. जिल्ह्यातील लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी जवळजवळ एकचतुर्थांश क्षेत्र म्हणजेच अन्नधान्य पिकांखालील क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्र ज्वारीखाली आहे.

कापूस हे जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी पीक होय. जिल्ह्यातील लागवडीखालील क्षेत्रापकी निम्म्याहून थोडेसेच कमी म्हणता उर्वरित बहुतेक प्रदेशात कापसाचे पीक घेतले जाते. कापसाखालील क्षेत्र व कापसाचे उत्पादन या दोहोंचाही विचार करता हा जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे. अमरावती, मोर्शी, तिवसा, चांदूर-बाजार व चांदूर-रेल्वे हे तालुके कापसाच्या उत्पादनाच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे होत.

कापूस व ज्वारी यांखालोखाल जिल्ह्यातील लागवडीखालील अधिक क्षेत्र तूर या डाळवर्गीय पिकाखाली आहे. तुरीखालील क्षेत्र व तुरीचे उत्पादन यामध्ये अग्रेसर असलेल्या जिल्ह्यापैकी हा एक गणला जातो.

अमरावती जिल्ह्यात अचलपूर, चांदूर-बाजार, अंजनगाव-सुर्जी व बडनेरा परिसरात विड्याच्या पानांचे मळे आहेत. दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरूड व अमरावती यापरिसरात मिरचीचे उत्पादन बऱ्यापैकी होते. मोर्शी व वरूड परिसरात केळी, संत्री व मोसंबीच्या बागा आहेत. धारणी व अचलपूर तालुक्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते.

अमरावती जिल्ह्यातील वने


अमरावती जिल्ह्यातील एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी एकचतुर्थांशहून अधिक क्षेत्र वनाच्छादित आहे. जिल्ह्याच्या वायव्य भागातील डोंगराळ भाग व दाट वनांनी व्यापलेला आहे. मेळघाट परिसरात घनदाट म्हणावीत अशी वने आहेत. वनांचा विचार करता धारणी, चिखलदरा, मोर्शी व वरूड हे तालुके अधिक समृद्ध आहेत. धारणी तालुक्यात उत्तम प्रतीच्या सागाची झाडे आहेत. चिखलदरा परिसर बांबूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मोर्शी व वरूड तालुक्यात धावडा, सालई आदी वृक्ष मोठ्या प्रमाणावर असून तेंदूपानांच्या उत्पादनासाठीही हे तालुके प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यातील वनांत आढळणाऱ्या ‘तिखाडी’ नावाच्या गवतापासून ‘रोसा’ हे तेल काढले जाते.

चिखलदरा तालुक्यात मेळघाट येथे १,५०० चौ. कि. मी. हून अधिक क्षेत्रावर मेळघाट अभयारण्य पसरलेले आहे. या अभयारण्यात वाघांची संख्या वाढावी यासाठी व्याघ्र प्रकल्पाची अंमलबजावणी केली जात आहे. हा राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. आज येथील अभयारण्यात शंभराच्या आसपास वाघ असावेत. वाघांशिवाय येथे बिबट्या, अस्वल, रानकुत्रा, भेकर इत्यादी प्राणी आढळतात. येथील वनांत सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.


राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा. या जिल्ह्यात यावली येथे २९ एप्रिल १९०९ रोजी त्यांचा जन्म झाला. मूळ नाव माणिक बंडोजी ब्राह्मभट्ट (ठाकूर).

अमरावती जिल्ह्यातील उद्योगधंदे


अमरावती जिल्ह्यात अमरावती येथे औद्योगिक वसाहत असून सातुर्णा येथे सहकारी औद्योगिक वसाहत आहे. अमरावती व मोझरी येथे औषधांचे कारखाने असून अमरावती येथे रासायनिक खतांचा व प्लॅस्टिकच्या उत्पादनाचा कारखाना आहे. अमरावती येथील औद्योगिक वसाहतीत अनेकविध वस्तूंच्या उत्पादनाचे कारखाने आहेत.

अंजनगाव-सुर्जी, अमरावती, अचलपूर, नांदगाव-खंडेश्वर, बडनेरा, दर्यापूर, चांदूर-रेल्वे, दत्तापुर, धामणगाव, तिवसा, चांदूर-बाजार, वरूड व मोर्शी या ठिकाणी जिनिंग-प्रेसिंगचे कारखाने असून बडनेरा व अचलपूर येथे कापड गिरण्या आहेत. अमरावती येथे एक सूत गिरणी असून चांदूर-रेल्वे तालुक्यात देवगाव येथे साखर कारखाना आहे.

अमरावती जिल्ह्यात अचलपूर, दारापूर, तिवसा परिसरात लाकूडकटाईच्या गिरण्या आहेत. मोर्शी व तिवसा येथे घोंगड्या विणण्याचा व्यवसाय चालतो. कसबे-गव्हाण, अचलपूर, शिराळा, दारापूर व मोझरी या भागात तढव व सतरंज्या विणण्याचा उद्योग चालतो.

अमरावती जिल्ह्यातील प्रमुख स्थळे


अमरावती: जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले हे शहर कापसाची मोठी बाजारपेठ असून येथे हस्तकला व हातमाग-यंत्रमाग उद्योग विकसित झालेला आहे. शहरात कापड गिरणी व सूतगिरणीही आहे. विदर्भातील हे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र अमरावती विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे. विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे नव्याने कार्यरत झाले आहे. शिवाजीराव पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांसाठी स्थापन केलेली ‘तपोवन’ ही संस्था येथेच आहे. येथे संत गाडगे महाराजांची समाधी असून येथील अंबादेवी मंदिरही प्रसिद्ध आहे.

हे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांना खुले व्हावे म्हणून १९२८ मध्ये डॉ. पंजाबराव देशमुख यांनी येथे सत्याग्रह केला होता. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेले ‘श्रद्धानंद छात्रालय’ येथे असून त्यांनीच स्थापन केलेल्या ‘श्रीशिवाजी शिक्षण’ संस्थेचे मुख्यालयही येथे आहे.


चिखलदरा परिसरात कोरकू, कोलाम (कोळंब), वसोडे, गोंड, माडिया-गोंड यांसारख्या आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. कोरकू जमातीचे लोक विवाहप्रसंगी करीत असलेले ‘बिहावू’ हे नृत्य, ‘ढेमसा’ हे गोंडांचे काठीनृत्य, ‘गावबांधणी’ हे कोलाम जमातीचे पारंपारिक नृत्य व माडियाचे ‘रेलो’ हे नृत्य ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट्ये आजही जपलेली आढळतात.

चिखलदरा: वनाच्छादित डोंगरदऱ्यांनी नटलेले चिखलदरा हे स्थळ राज्यातील एक महत्त्वाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे निसर्गरम्य स्थळ ‘विदर्भाचे नंदनवन’ म्हणून ओळखले जाते. चिखलदऱ्याच्या पश्चिमेस सुमारे नऊ किलो मीटर अंतरावर ‘बैराट’ (१,१७७ मीटर) हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे.

गाविलगड: चिखलदरा तालुक्यात चिखलदऱ्यापासून दोन-तीन कि. मी. अंतरावर. गाविलगड व परिसर गोंड राजांच्या अमलाखाली होता, मोगल मराठे व त्यानंतर ब्रिटिश यांचा अंमलही या किल्ल्याने पाहिला आहे.

अचलपूर: अचलपूर तालुक्यातील ठिकाण. अचलपूरपासून जोडगाव म्हणता येईल इतके जवळ असलेले हे ठिकाण इमारती लाकडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.

रिथपूर: रिथपूर किंवा रिद्धपूर म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण मोर्शी तालुक्यात आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधरस्वामी यांचे गुरू श्रीगोविंदप्रभू यांचे वास्तव्य येथे होते. येथे गोविंदप्रभूंची समाधीही आहे.

मोझरी: पूर्वी ‘एलिचपूर’ नावाने ओळखले जाणारे हे गाव एकेकाळी अतिशय भरभराटीला आलेले शहर होते. खिलजीच्या तसेच इमादशाही व निजामशाही राजवटीत या गावास राजधानीचे महत्त्व होते. संत तुकडोजी महाराजांनी स्थापन केलेला ‘गुरुकुंज आश्रम’ येथे आहे. येथे संत तुकडोजी महाराजांची समाधीही आहे.

ऋणमोचन: भातकुली तालुक्यात पूर्णा नदीकाठी असलेल्या या ठिकाणी मुद्गलेश्वराचे मंदिर आहे.

बडनेरा: नांदगाव-खंडेश्वर तालुक्यात असलेले हे ठिकाण रेल्वे जंक्शन म्हणून प्रसिद्ध आहे. येथे सूत गिरणी आहे. विड्याच्या पानांसाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे.

कौंडिण्यपूर: प्राचीन काळी कुंडिनी, कुंडिल, कुंडिनपूर या नावाने ओळखले जाणारे हे स्थळ सध्याच्या तिवसा तालुक्यात वसले आहे. वर्धा नदीकाठचे हे स्थळ प्राचीन अवशेषांसाठी विशेष प्रसिद्ध आहे.

बहिरम: चांदूर-बाजार तालुक्यात सातपुडा डोंगररांगांत वसलेले ठिकाण. येथील बहीरमबुवाची यात्रा प्रसिद्ध आहे.


‘चिखलदरा’ हे विदर्भातील एकमेव गिरीस्थान असून राज्यात फक्त येथेच कॉफीचे मळे आढळतात.

याशिवाय सालबर्डी (मोर्शी तालुक्यात. गुहेतील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध.); नांदगाव-खंडेश्वर (तालुक्याचे मुख्य ठिकाण. खंडेश्वर महाराजांचे मंदिर प्रसिद्ध.); भातकुली (भातकुली तालुक्याचे मुख्य ठिकाण. पेढी नदीकाठी. जैनांचे तीर्थक्षेत्र.) ही जिल्ह्यातील अन्य महत्त्वाची स्थळे होत.

अमरावती जिल्ह्यातील वाहतूक


धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा जिल्ह्यातून जातो. या महामार्गावर लोणी, बडनेरा, अमरावती, मोझरी व तिवसा ही जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणे आहेत.

अमरावती जिल्ह्यातून एक राज्य मार्ग अमरावतीपासून निघून अचलपूर, परतवाडा, धारणीमार्गे मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूरकडे जातो; तर दुसरा राज्य मार्ग अमरावतीहून बडनेरा, नांदगाव-खंडेश्वरमार्गे यवतमाळकडे जातो.

मुंबई-कलकत्ता हा मध्य रेल्वेचा लोहमार्ग अमरावती जिल्ह्याच्या दक्षिण भागातून जातो. बडनेरा, चांदूर-रेल्वे व धामणगाव ही या लोहामार्गावरील जिल्ह्यातील प्रमुख स्थानके होत. खांडवा-अकोला-पूर्णा हा लोहमार्ग जिल्ह्याच्या पश्चिम भागातून जातो. धूळघाट हे या मार्गावरील महत्त्वाचे स्थानक होय.

बडनेरा-अमरावती हा जिल्ह्यातील आणखी एक लोहमार्ग होय. या लोहमार्गाने अमरावती शहर, जवळच असलेल्या बडनेरा या रेल्वे जंक्शनशी जोडले गेले आहे.


मेळघाट परिसरात चिखलदरा व धारणी या तालुक्यांत आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. ‘कोरकू’ ही येथील प्रमुख आदिवासी जमात होय. घराच्या मागील बाजूने बाहेर पडण्याची पद्धती या लोकांमध्ये आढळते. भात हे यांचे मुख्य अन्न होय. भाताला हे ‘बाबा चावळी’ असे म्हणतात. ‘खेकादेव’ व ‘मुठबा’ हे यांचे प्रमुख देव होत. कोरकू जमातीच्या पुजाऱ्याला ‘भुमका’ या नावाने ओळखले जाते.


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय: 1
 1. अमरावती जिल्ह्यात एकुण १४ तालूके आहेत. धामनगांव रेल्वे हा तालूका आपल्या यादीत कमी दिसतो. संत गाडगेबाबा, कवी सुरेश भट, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील हे ही अमरावतीकर आहेत....

  उत्तर द्याहटवा

नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,15,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1114,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,1,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,874,आईच्या कविता,21,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,4,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आदित्य कदम,1,आनं कविता,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,23,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,17,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,46,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,61,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,10,गोड पदार्थ,56,गौतम जगताप,1,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,424,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,71,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,56,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,9,निवडक,4,निसर्ग कविता,23,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,12,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,14,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,90,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,8,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,101,मराठी कविता,743,मराठी गझल,24,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,14,मराठी टिव्ही,42,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,15,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,41,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,158,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश बिऱ्हाडे,4,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,87,मातीतले कोहिनूर,17,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,21,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,8,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामकृष्ण जोशी,1,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,55,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,6,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,10,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,30,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,131,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,21,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सीमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,18,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: अमरावती जिल्हा (महाराष्ट्र)
अमरावती जिल्हा (महाराष्ट्र)
अमरावती जिल्हा - [Detailed Information and Photos of Amravati District] अमरावती जिल्ह्याबद्दल संपुर्ण माहिती आणि छायाचित्रे.
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhfLtY6mDcDceZB02yPDuCFNRZtINo7C-a3KO6qo7geRalkkO10XpCFVdArC_N9rilOTjzrlMWw77m-OVtB1dpeD4Qo4lv1wTWlQDq3ygeFDXlOy9Ez-JyysFa1uFQborpWABOVFmdLkOLtoqXa6inHlerMdemb18KiYXpP9cW5IFhMF1MXW8cRoWbbdg/s1600-rw/amravati-district.jpg
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhfLtY6mDcDceZB02yPDuCFNRZtINo7C-a3KO6qo7geRalkkO10XpCFVdArC_N9rilOTjzrlMWw77m-OVtB1dpeD4Qo4lv1wTWlQDq3ygeFDXlOy9Ez-JyysFa1uFQborpWABOVFmdLkOLtoqXa6inHlerMdemb18KiYXpP9cW5IFhMF1MXW8cRoWbbdg/s72-c-rw/amravati-district.jpg
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2022/09/amravati-district.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2022/09/amravati-district.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची