Loading ...

रांजणगावाचा महागणपती (गणपतीच्या गोष्टी)

रांजणगावाचा महागणपती (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला ‘महागणपती’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट.

रांजणगावाचा महागणपती - गणपतीच्या गोष्टी | Shri Ranjangaoncha MahaGanpati - Ganpati Stories

आपल्या लाडक्या बाप्पाला ‘महागणपती’ हे नाव कसे पडले असेल? त्याचीच ही रंजक गोष्ट


रांजणगावाचा महागणपती (गणपतीच्या गोष्टी)

मुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘महागणपती’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.



पुरातन काळी गृत्समद नावाच्या ऋषींचा मुलगा थोर गणेशभक्त होता. त्याने ‘ॐ गणांना त्वा’ हा गणेशमंत्राचा जप केला. त्याचे कठोर तप पाहून श्रीगणेशाने प्रसन्न होऊन त्याला अलौकिक सामर्थ्य देऊन सोने, रुपे व लोखंड या तीन धातूंची तीन नगरे ‘त्रिपुरे’ बनवून दिली.

श्रीगणेशाकडून वर मिळाल्याने हा त्रिपुराचा राजा पुढे फारच उन्मत्त झाला. त्याने पृथ्वीवर सर्वत्र उच्छाद मांडला. पृथ्वीवासियांचा त्याने अनिन्वित छळ सुरू केला. देवांनाही त्याने सळो की पळो करून सोडले. त्रिपुरासूराने इंद्राचे आसनही काबीज केले. त्याने देवांचे अधिकार राक्षसांना देऊन टाकले. त्यामुळे भयभीत झालेल्या देवांनी शंकराची आराधना केली.

तेव्हा भगवान शंकरांनी आपल्या त्रिशुळाने धातूंची ती तीन त्रिपुरे उध्वस्त करून त्रिपुरासूराचा वध केला. त्रिपुरासूर हा गणेशभक्त असला तरी त्याने गणेशकृपेचा दुरुपयोग केल्याने त्याला शासन करणे महादेवास शक्य झाले.

म्हणूनच सुजनभक्तांवर कृपा करणाऱ्या ‘श्रीमहागणपतीची’ रांजणगाव येथे लोकांनी प्रतिष्ठापना केली.

रांजणगावाचा महागणपती (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची