Loading ...
/* Dont copy */

पंढरपूरी आली वारी (मराठी कविता)

पंढरपूरी आली वारी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी गोकुळ कुंभार यांची पंढरपूरी आली वारी ही मराठी कविता.

पंढरपूरी आली वारी (मराठी कविता)

भाविक - भक्त, साधू - संत, पायी चालत आले पंढरपूरी


पंढरपूरी आली वारी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘गोकुळ कुंभार’ यांची ‘वारी’ ही मराठी कविता.



भाविक - भक्त, साधू - संत
पायी चालत आले पंढरपूरी
बा विठ्ठला तुझी माया
कायम असुदे रे आम्हावरी

युगे अठ्ठावीस भक्तासाठी
उभा तु विठेवरी
विश्रांतीसाठी थोड दिवस
चल ना माझ्या घरी

मी पामर शेतकरी
लोण्याचा गोळा खाणारा
तुला पचेल का
माझी जाड भाकरी

तु थंड हवेत राहणारा देव
माझ्या चंद्रमौळी झोपडीत
तुला भरेल ना रे हिव

देवा दर महिना
अखंड करतो तुझी वारी
नाही देत तुला त्रास
बरा आहेस तु उभा भीमातीरी

या कलीयुगात काय भरोसा नाय
जगलो तर आलोच तुझ्या भेटीला
निसर्ग आदीच खवळलाय
गरीब जनता मरतेय
नको धाडू अजून तु संकटाला

देवा लोटांगण घेऊन मागणे
मागतो यंदा तुझ्या दारी
सुखी ठेव रे तो शेतात राबणारा शेतकरी

जातो आता देवा वाट बघत
असतील घरची
शेतात भाताची लावणी जी करायची

बोला पांडुरंग हरी...


पंढरपूरी आली वारी (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- गोकुळ कुंभार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची