पाऊसधारा (मराठी कविता)

पाऊसधारा - (मराठी कविता) सरळ सोप्या भाषेत पावासाचं वातावरण व्यक्त करणारी गोकुळ कुंभार यांची पाऊसधारा ही कविता.
पाऊसधारा (मराठी कविता)
पाऊसधारा (मराठी कविता), चित्र: हर्षद खंदारे.
पाऊसधारा - (मराठी कविता) सरळ सोप्या भाषेत पावासाचं वातावरण व्यक्त करणारी गोकुळ कुंभार यांची पाऊसधारा ही कविता.

मन तृप्त करणारा मातीचा सुंगधी सुवास पसरेल सगळीकडे जेव्हा कोसळतील या पाऊसधारा या उघड्या माळरानावर हिरवे रंग भरले जातील जेव्हा कोसळतील या पाऊसधारा मोरांच थुई थुई नाचणं दिसेल सुंदर पिसारा फुलेल जेव्हा पडतील या पाऊसधारा जेव्हा पाऊस विश्रांती घेईल तेव्हा दवबिंदूचा सप्तरंगाचा इंद्रधनुष्य दिसेल जेव्हा कोसळतील या पाऊसधारा पहाटेचा मंद गार वारा अंगाशी लाडीक चाळे करेल जेव्हा कोसळतील या पाऊसधारा जमिनीची मशागत करून थकलेला जगाचा पोशिंदा आनंदाने घरी विश्रांती घेईल जेव्हा कोसळतील या पाऊसधारा

- गोकुळ कुंभार

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.