
सुगंध हि मातीचा मना भरला - (मराठी कविता) कवी धनराज बाविस्कर यांची पावासाच्या सुरूवातीचे वर्णन करणारी ग्रामीण शब्दरचनेतील कविता सुगंध हि मातीचा मना भरला.
खेळती हवा हि मंद पावसा रे तू तुझ्या अमृत सरा वाहू देना रे तू सुगंध हि मातीचा मना भरला ॥ १ ॥ काळी हि ढग झाली पांढरी पीक वाट पाहि ढगा भूईवर साथ तुझी असावी देवा शंकरा नशीबाची मांडनी तुझ्यावर हिरवी चादर पसरली रे तू शेतकरीचा तूच देव रे तू सुगंध हि मातीचा मना भरला ॥ २ ॥ रंग तांबड्याचा उगली पात शेतकरीची ती कठिण रात वाऱ्याशी खेळत उन्हाशी तपत मऊ माती लागे शिवारात सुंदर सुखाचे मनाचे वारे रे तू ओठावर गाणी तळे भरली रे तू सुगंध हि मातीचा मना भरला ॥ ३ ॥