Loading ...
/* Dont copy */

केसांची निगा (आरोग्य)

केसांची निगा (आरोग्य) - सुंदर मऊ, काळेभोर, लांबसडक केस प्रत्येकाला आवडतात यासाठी त्यांची निगा कशी राखावी याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.

केसांची निगा (आरोग्य)
केसांची निगा (आरोग्य), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
केसांची निगा (आरोग्य) - केसांच्या मुळाशी नैसर्गिक तेल असते. या तेलाने केसांना पोषण मिळून ते घट्ट, काळे राहतात. केसांच्या मुळाशी असलेल्या तेलामुळे त्याच्या जवळच्या पेशी व अनेक बारीक नसांना हवेपासून म्हणजेच थंडी उष्णतेपासून रक्षण मिळते.

हल्ली आधुनिक राहणीच्यापायी पुष्कळ जण रोज डोक्यावरुन साबण लावून आंघोळ करतात. नैसर्गिक तेलाचा यामुळे नाश होतो.

तेलाशिवाय केस कोरडे व राठ होऊन गळू लागतात. केस पुष्कळ गळल्याने डोक्याला टक्कल पडते. केस पांढरे होऊ लागतात.

नेहमी तेल मॉलिश करावे. डोके खुप घासावे.

हिवाळ्यात मोहरीच्या तेलाने व उन्हाळ्यात तिळाच्या तेलाने मालिश करावे. आयुर्वेदाचा प्रसाद रूप असे नारायण तेल बाराही महिने वापरता येते. मालिश हलक्या हाताने करावे.

मालिश केल्यावर तेलाच्या हाताने केस हळूहळू ओढा. केसाच्या मुळासी चोळा, तेलाचा हात असला तर या ओढण्याचा कंटाळा येत नाही. असे ओढण्याने, चोळण्याने केसांच्या मुळांना व्यायाम मिळतो. त्यामुळे नैसर्गिक तेल जास्त प्रमाणात झरू लागते. केस मुळाशी अधिक घट्ट होतात म्हणून गळतही नाहीत.

मालिश केल्यावर डोक्यावर हळूहळू थापट्या मारा, थोपटा, केस थोडेसे ओढा. या कसरतीने केसाच्या मुळाशी असलेली रंध्रे उघडी होतात. त्यातून नैसर्गिक तेल झरू लागते.

मॉलिशमुळे रूधिराभिसरणाला गती प्राप्त झाल्याने मुळाजवळच्या अवयवांना रक्ताचा पुरवठा आवश्यक प्रमाणात मिळतो. त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

या नैसर्गिक तेलाचा खुराक मिळाल्याने केस काळे राहतात. मुळापासून गळत नाहीत व घट्ट राहतात. केस मऊ, दाट व सुंदर दिसल्याने चेहराही चांगला दिसतो.

उन्हाळ्यात वा हिवाळ्यात उघड्या डोक्याने फिरू नका.

शिर्षासन आणि सर्वांगासन अशी आसने नियमितपणे केल्यास केस व मस्तकातील इतर अवयव यांना आश्चर्यजनक फायदा होतो. या आसनामुळे रूधिराभिसरणाची गती वाढते.

शिर्षासन आणि सर्वांगासन या आसनामुळे पांढरे झालेले केस कृत्रिम उपायांशिवाय काळे करणाच्या उपाय अजूनपर्यंत शोधलेला नाही हे सत्य आहे.

पण तरूणपणातच ही दोन्ही आसने करीत गेल्यास केसांना भरपूर आरोग्य व पोषण लाभत असल्याने वृद्धावस्थेपर्यंत केस काळे राहतात व टक्कल पडत नाही.

विशेषतः तरूणांनी ही आसने जरूर करावीत व केसांना चिरतरूण ठेवावे.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची