Loading ...

जेवणातील आवश्यक पौष्टिक तत्व (आरोग्य)

जेवणातील आवश्यक पौष्टिक तत्व (आरोग्य) - जेवणात पौष्टिक तत्वांचा योग्य समावेश कसा करावा याबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख.

जेवणातील आवश्यक पौष्टिक तत्व (आरोग्य)
जेवणातील आवश्यक पौष्टिक तत्व (आरोग्य), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
जेवणातील आवश्यक पौष्टिक तत्व (आरोग्य) - शरीराला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी जेवणात पौष्टिक तत्वांचा योग्य समावेश असणे आवश्यक आहे. हे कोणतं तत्व आहेत व यांना काय फायदा आपल्याला होऊ शकतो, समजुया.

प्रोटीन

शारीरिक विकास, उत्साह आणि शक्ति या सर्वांसाठी प्रोटिन आवश्यक आहे. हे प्रोटीन्स आपल्याला सर्व धान्य, मटार, कडधान्य, दूध, ताक, पनीर व इतर दुधापासून तयार केलेले पदार्थ, फळे यांच्यातून मिळते.

वसा

शरीरात शक्ती आणि उर्जेसाठी वसा घेणे आवश्यक आहे. दूध, दही, तूप, क्रिम, लोणी, तेल, काजू, बादाम, शेंगदाणे इत्यादी जास्त प्रमाणात वसा असतो.

खनिज

खनिज शरीरात शक्ति कायम ठेवण्याचे काम करतात. हाडे मजबूत ठेवण्यासाठी व शरीर रोगमुक्त ठेवण्यासाठी खनिजांचा जेवणात समावेश अत्यावशयक आहे.

कार्बोहाइड्रेट

शक्ति, उर्जा व शारीरिक विकासासाठी कार्बोहाइड्रेड आवश्यक आहेत. गहू, मक्का, ज्वारी, बाजरी, ऊस, मोड, फळे इत्यादीत.

पाणी

शरीरात पाण्याचे प्रमाण भरपूर आहे. शरीराची अंतर्गत स्वच्छता ठेवण्यासाठी पाणी मदतगार ठरते. योग्य प्रमाणात पाणी प्यायलाने अन्नाचे चांगले पचन होण्यास मदत होते व शरीराचे तापमान योग्य राहते.

कॅल्शियम

हाडे, दात व केसांच्या विकासासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. याने मासिक पाळी संबंधी त्रास नियंत्रित होतात. हिरव्या भाज्या, दूध, दही, ताक, पनीर इत्यादी मध्ये कॅल्शियम भरपूर असते.

लोह तत्त्व

लोह तत्त्वांच्या कमतरतेने शरीरात रक्ताची कमी होते. याच्या अभावाने हृदय व शरीराच्या प्रत्येक भागात शुद्ध रक्त पोहचवण्यात असमर्थ होते.हे हिरव्या भाज्या, धान्य, फळे इत्यादीमध्ये सापडते.

विटामिन

शरीर स्वस्थ व रोगमुक्त ठेवण्यासाठी विटामिन गरजेचे आहे. हिरव्या भाज्या, ताजी फळे, गहू, दुधापासून तयार केलेले पदार्थ लोणी, मोड आलेली कडधान्ये, घेवडा इत्यादी राज्यात मध्ये विटामिन्स मोठ्या प्रमाणात असतात.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची