कुशलतेचे चक्र नव्याने - मराठी कविता

कुशलतेचे चक्र नव्याने, मराठी कविता - के तुषार यांची कुशालतेचे चक्र नव्याने ही कविता.
कुशलतेचे चक्र नव्याने - मराठी कविता
कुशलतेचे चक्र नव्याने (मराठी कविता), चित्र: हर्षद खंदारे
के तुषार यांची कुशालतेचे चक्र नव्याने ही कविता.

नव्या युगाच्या नव्या स्वप्नांना चला साकार करूया विविध कौशल्याला आपण आकार नवा देऊया दैनंदिनी ही आयुष्याची सांगड घालीत चलते कौशल्याच्या आधारावर रोजीरोटी चालते सुरू करू सुरुवात उद्याची आज पाऊले ठेवूया कुशल बनवू अन् काम करूनी जीत यशाची गावुया खुशाल या सहभाग नोंदवू कौशल्याची पाणी भरवू प्रत्यक्ष शिक्षण आपण घेऊ सर्वत्र सर्वदा प्रसार करवू मार्ग मिळवण्या आयुष्याचे सूत्रे यशाचे शोधूया या धरतीवर या मातीवर कुशलतेची बाग फुलवू या मशाल पेटवू सक्षमतेची खुशाल निर्मुया झरा बहुविध कौशल्याच्या जोरावर आदर्श घडवूया खरा कौशल्याची गाडी (SOW) आज पोहोचते घराघरात कुशल घडतील ठसा उमटविण्या मानवतेच्या मनामनात द्या हाक तुमची घ्या साद आमची करू जगभर कुशल दिवाने इतिहास नव्याने निर्माण करू सुवर्णाक्षराने मग आपण मिरवू

- के तुषार

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.