
कवी के तुषार यांचीटिपलेलं फुलही कवीता.
तू फक्त प्रकाश टिपलास आधाशासारख्या फुलांवरचा त्यांच्या सुगंधाची कसरत कशी समजेल? एक सुखद भावना फुलवायला कधीतरी ओढावे ते फुल मनाच्या कोपऱ्यापासून स्वच्छंद होण्यासाठी पाकळ्यांना बोलावं हवेतून सोडावेत काही सुर तिच्या मनाला खुलवायला नकळत गळतील पाने कधी वेळ आली कि मातीत मिळून जातील मळतील केसांच्या रूपांची पडदे त्या पडदा पद्धतीला उध्वस्त करन्यास समाजाच्या मळ्यात तयार होतील माळी जे स्वातंत्र्याचा पडदा वापरतील त्या बलात्कारित मृत अबालीकेवर पांघरण्यास फुलांना कुस्करता सुगंधच मिळे इतकं पवित्र फुल प्रसन्नता ठेवणारं मिळतं कधी वेणीत, वहीत, पत्रात, आणि फुलांच्या हारामध्ये व्याकुळलेल्या मनस्थितीला मोल देण्यासाठी नाहीतर भेटतं ते असंच ओसाड माळराणावर भटकंती करताना अगदी एकटेपणात