स्वातंत्र्य - मराठी कविता

स्वातंत्र्य, मराठी कविता - कवी के तुषार यांची स्वातंत्र्य ही कवीता.
स्वातंत्र्य - मराठी कविता
स्वातंत्र्य (मराठी कविता) कवी के तुषार यांची स्वातंत्र्य ही कवीता, चित्र: हर्षद खंदारे
कवी के तुषार यांची स्वातंत्र्य ही कवीता.

भविष्यात कधी भेटलीस तर आवर्जून बोल अगदी स्वातंत्र्यातल्या निर्भिड महीले सारखं तुझ्या दबलेल्या विचारांना मोकळं कर मनावरचा ताण हलका कर त्याच्याजवळ ज्याच्या नावाचं कुंकू तू रोज भाळतेस दाखव त्याला तुझा मुक्तछंद इतिहास तुझ्या ज्ञानाच्या परिसीमा अव्वल ठरलेल्या एके काळी आज तू चार भिंतीत बांधून घेऊन मरण पाहू नकोस तुझ्या भाषणातल्या क्रांतिकारी स्त्रिया केवळ मांडू नकोस विवस्त्रित करून त्यांच्या हातात लेखणी दे मशालीसम तलवारी सोबत लढावयास बळ दे कुणाचाही सामना करण्यास मग त्या सबळ होतील

- के तुषार

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.