घर थकलेले संन्यासी - मराठी कविता

घर थकलेले संन्यासी,मराठी कविता - ज्येष्ठ कवी माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांची प्रसिद्ध कविता घर थकलेले संन्यासी हर्षद खंदारे यांच्या आवाजात.
घर थकलेले संन्यासी - मराठी कविता
ज्येष्ठ कवी माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांची प्रसिद्ध कविता घर थकलेले संन्यासी (मराठी कविता), चित्र: हर्षद खंदारे
ज्येष्ठ कवी माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांची प्रसिद्ध कविता घर थकलेले संन्यासी मराठीमाती डॉट कॉम चे संपादक हर्षद खंदारे यांच्या आवाजात.
कवी: ग्रेस, आवाज: हर्षद खंदारे

घर थकलेले संन्यासी, हळू हळू भिंतही खचते आईच्या डोळ्यांमधले नक्षत्र मला भासवते ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते ढग ओढुनी संधेवानी आभाळ पसरले होते पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी एक एक ओंजळी मागे असतेच झऱ्याचे पाणी मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई ये हलके हलके मागे त्या दरीतली वनराई

- कवी ग्रेस (माणिक सीताराम गोडघाटे)
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

२ टिप्पण्या

  1. धग नाही, ढग
    1. धन्यवाद, सदर टंक लेखनातील चूक दुरुस्त केली आहे.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.