शेतात राबतो, शेतकरी बाप, नाही त्याच्या, माप संकटांना
शेतात राबतो
शेतकरी बाप
नाही त्याच्या
माप संकटांना
सदा असे माथी
कर्जाचा डोंगर
तरीही सादर
घरासाठी
साठवी दुःखाला
सदा काळजात
भर वादळात
ठाम उभा
मनाने कोमल
दिलाने सज्जन
विठूचे भजन
बाप माझा
चिंध्या पांघरुन
आम्हा वस्त्र देतो
राबतो कष्टतो
मुलांसाठी
माझ्यासाठी देव
असे माझा बाप
नित्य करु जाप
माझ्या देवा
असा कसा देवा
माझ्याशी वागला
बाप हिरावला
कशासाठी?
- भरत माळी