काय सांगू तुला, मी किती प्रेम केलं, कसं सांगू तुला
काय सांगू तुला
मी किती प्रेम केलं
कसं सांगू तुला
मी खरं प्रेम केलं
तुझ्या थकल्या जीवानं
चैतन्य रे कमावलं
पण ते कमवण्याच्या नादात
मी खूप काही गमवलं
का म्हणे तू
जीव का रंगला
कसं सांगू तुला
तो अनोळखा गंध
साऱ्या मैत्रीत पांगला
मैत्रीचा धागा
काचून रुतला
काय सांगू तुला
तो सोडण्याच्या नादात
आपला जीव गुंतला
- प्रिती चव्हाण