ते प्रेम असते - मराठी कविता

ते प्रेम असते, मराठी कविता - [Te Prem Asate, Marathi Kavita] मागणी नंतरचे हो नाही, म्हणजे प्रेम नसते.
ते प्रेम असते - मराठी कविता | Te Prem Asate - Marathi Kavita

मागणी नंतरचे हो नाही, म्हणजे प्रेम नसते

मागणी नंतरचे हो नाही
म्हणजे प्रेम नसते
अबोलपणे लागलेली ओढ
म्हणजे प्रेम असते
जे सांगण्याची गरज नसते
ते प्रेम असते
जसे आळवाचं पान अन्‌ त्या वरील थेंब
तेच ते प्रेम असते

- प्रिती चव्हाण

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.