कोहळ्याच्या वड्या - पाककृती

कोहळ्याच्या वड्या, पाककला - [Kohalyachya Vadya, Recipe].
कोहळ्याच्या वड्या - पाककृती | Kohalyachya Vadya - Recipe

कोहळ्याच्या वड्या


कोहळ्याच्या वड्याकोहळ्याच्या वड्या करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • ५०० ग्रॅम कोहळ्याचा कीस
 • २ नारळ
 • ३ वाट्या साखर
 • १ वाटी पिठी साखर
 • एक चमचा तूप
 • १ वाटी साय किंवा खवा

कोहळ्याच्या वड्या करण्याची पाककृती


 • किस वाफवून घ्यावा.
 • नारळ खरवडून मिक्सरमध्ये बारीक वाटावा.
 • एका कल्हईच्या जाड बुडाच्या पातेल्याला तूपाचा हात फिरवावा.
 • त्यात नारळ कीस, साधी साखर, व साय किंवा कुस्करलेला खवा घालावा.
 • चुलीवर ठेवून मंद आंचेवर ढवळत राहावे.
 • मिश्रण घट्ट होऊन कडेने सुटायला लागले की पिठी साखर घालून एकदोन मिनिटे चुलीवर ढवळावे.
 • खाली उतरवून मिश्रण कोमट होईपर्यंत घोटावे.
 • तूपाचा हात फिरवलेल्या ट्रेमध्ये मिश्रण ओतावे व पृष्ठभाग गुळगुळीत करावा.
 • नंतर निवल्यावर वड्या कापाव्यात.

कोहळ्याच्या वड्या

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.