भाजणीची बोरे - पाककृती

भाजणीची बोरे, पाककला - [Bhajanichi Bore, Recipe].
भाजणीची बोरे - पाककृती | Bhajanichi Bore - Recipe

भाजणीची बोरे


भाजणीची बोरेभाजणीची बोरे करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • ३ वाट्या भाजणीचे पीठ
 • अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याच्या कीस
 • १ चमचा जिरेपूड
 • १ चमचा धनेपूड
 • १ लिंबाचा रस
 • तिखट
 • हळद
 • हिंग
 • मीठ
 • तेलाचे मोहन

भाजणीची बोरे करण्याची पाककृती


 • खोबर्‍याचा कीस भाजावा.
 • धणे, जीरे कोरडेच भाजून पूड करा.
 • नंतर सर्व जिन्नस एकत्र करून घट्ट पीठ भिजवा.
 • त्याचे छोटे छोटे सुपारीएवढे गोळे करून तळा.
 • घरातल्या लहान मुलांना गोळे करायला बसवा.

भाजणीची बोरे

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.