गुळपापडीचे लाडू - पाककृती

गुळपापडीचे लाडू, पाककला - [Gulpapadiche Ladoo, Recipe].
गुळपापडीचे लाडू - पाककृती | Gulpapadiche Ladoo - Recipe

गुळपापडीचे लाडू


गुळपापडीचे लाडूगुळपापडीचे लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • २ वाट्या कणीक
  • १ वाटी बारीक चिरलेला गूळ
  • १ डाव भाजलेले तीळ
  • ४ - ५ वेलदोड्याची पूड व तूप

गुळपापडीचे लाडू करण्याची पाककृती


  • तुपावर कणीक भाजावी.
  • छान वास आला की उतरवावी.
  • गरम कणकेतच किसलेला गूळ घालून उलथन्याने चांगले ढवळावे.
  • तीळ व वेलदोड्याची पूड घालून लगेचच लाडू वळावे.

गुळपापडीचे लाडू

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.