दराबे लाडू - पाककृती

दराबे लाडू, पाककला - [Darabe Ladoo, Recipe].
दराबे लाडू - पाककृती | Darabe Ladoo - Recipe

दराबे लाडू


दराबे लाडूदराबे लाडू करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • ५०० ग्रॅम चांगल्यातले गहू
 • २५० ग्रॅम पिठीसाखर
 • १ वाटी घट्ट डालडा
 • २ चमचा साजूक तूप
 • ५ - ६ वेलदोड्याची पूड
 • पाव जायफळाची पूड

दराबे लाडू करण्याची पाककृती


 • गहू रात्री पाण्यात भिजत घाला.
 • सकाळी उपसून एका डब्यात सैल पुरचुंडी करून बांधा.
 • दुसर्‍या दिवशी कपड्यावर पसरून वाळवा.
 • नंतर त्याचा रवा काढा.
 • तो चाळला की खाली थोडे पीटही पडेल.
 • जाड बुडाच्या पातेल्यात त्या व सपीट वेगवेगळे भाजा.
 • नंतर हे मिश्रण थाळीत ओता.
 • भाजून घेतलेले मिश्रण गार झाल्यावर हाताने खूप फेसावे.
 • नंतर त्यात साखर घालून लाडू वळावे.

दराबे लाडू

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.