परवा मला डार्विन भेटला - मराठी कविता

परवा मला डार्विन भेटला, मराठी कविता - [Parva Mala Darwin Bhetla, Marathi Kavita] परवा मला डार्विन भेटला, भरकटलेला, विस्कटलेला, म्हटलं, का रे डार्विन.
परवा मला डार्विन भेटला - मराठी कविता

परवा मला डार्विन भेटला, भरकटलेला, विस्कटलेला, म्हटलं, का रे डार्विन बाबा

परवा मला डार्विन भेटला
भरकटलेला, विस्कटलेला
म्हटलं, का रे डार्विन बाबा
चेहरा तुझा उदासलेला?

उत्क्रांतीच्या सिद्धांतांनी
एवढं मोठं केलं तुला
अरे तूच सांगितलं ना
माकडापासून माणूस झाला?

डार्विन, सांगू? अवती भोवती
माणसं खूप दिसतात मला
त्यातली कित्येक दाखवून देतात
माणसापासून माणूस झाला

शेपूट झडली, नखं खुंटली
माणूस घडला पुढारलेला
अगदी पटतं जेव्हा कोणी
करु लागतं मर्कट लीला

डार्विन दादा बोलू लागला
मित्रा काय सांगू तुला?
उत्कांतीच्या सिद्धांतातला
अर्धा भागच खरा ठरला

माकडापासून माणूस झाला
इथेच माझा शोध संपला
क्षितिजावरती यंत्र जन्मले
याचा मला विसर पडला

निरुपयोगी अवयव झडले
घडला माणूस सुधारलेला
उत्क्रांतीच्या या तत्वाचा
पुढला भाग सुरू झाला

मला दिसतंय जग उद्याचं
धरून माझ्या तत्वाला
काय भयानक घडेल याची
चिंता बेचैन करते मला

- प्रफुल्ल चिकेरूर

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.